
LG Smart TV Privacy Concerns: LG Smart TV यूजर्स सावधान! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
या लोकांनी जे सांगितलं ते खूपच घाबरवणारं आहे. ते म्हणाले, टीव्हीची स्क्रीन बंद असतानाही त्यातून ऑडिओचा डेटा बाहेर जात राहतो. याचा अर्थ आपले बोलणे टीव्ही ऐकत होता. त्यांनी इंटरनेट बंद करून पण बघितलं, तेव्हाही टीव्ही डेटा त्याच्या मेमरीमध्ये साठवून ठेवत होता आणि जसा इंटरनेट चालू झाला तसा तो डेटा कंपनीच्या सर्व्हरवर पाठवत होता.
आरोप झाल्यावर LG ने लगेच खुलासा केला. कंपनी म्हणाली, “आमचा टीव्ही परवानगीशिवाय कोणाचंही बोलणं रेकॉर्ड करत नाही.”त्यांचं म्हणणं असं आहे की, तुम्ही रिमोटवरचं आवाजाचं बटण दाबलं किंवा “Hi LG” असं म्हटलं तरच टीव्ही ऐकतो. जर तुम्ही काहीच बोलला नाही किंवा त्याला कमांड कळली नाही तर तो आवाज लगेच डिलीट होतो. तो आमच्या सर्व्हरवर जातच नाही.पण मग त्या रिसर्चर लोकांना ऑडिओ ट्रॅफिक कसा दिसला? यावर अजूनही वाद चालू आहे. LG Smart TV Privacy Concerns:
या टेस्टमध्ये आणखी एक गोष्ट समोर आली. त्यांनी Wireshark नावाचं एक टूल लावलं होतं ज्याने नेटवर्कमध्ये काय चाललंय ते कळतं. त्यांना दिसलं की LG चा टीव्ही घरातले दुसरे गॅझेट शोधत होता. तुमचा फोन, तुमचं घड्याळ, लॅपटॉप, आणि जवळपासचे वाय-फाय नेटवर्क पण तो स्कॅन करत होता.आता याचा अर्थ असा नाही की टीव्ही तुमच्या फोनमधले फोटो किंवा मेसेज वाचतोय. तसं नाही.
AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला
पण तो नेटवर्कवर कोण कोण जोडलेलं आहे हे बघतोय. LG म्हणते की हे तर सगळेच स्मार्ट टीव्ही करतात. घरातले दुसरे डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी हे करावं लागतं. हे एक नॉर्मल फीचर आहे.तुम्ही काय बघता यावर पण लक्षफक्त आवाजच नाही तर तुम्ही टीव्हीवर काय बघता यावर पण टीव्ही लक्ष ठेवतो. याला ACR म्हणतात –
.तुम्ही यूट्यूबवर काय बघता, Netflix वर काय बघता एवढंच नाही तर HDMI ने लावलेल्या दुसऱ्या डिव्हाईसवर काय बघता हे पण त्याला कळतं.आणि मग याच माहितीवरून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. तुम्ही जर क्रिकेट बघत असाल तर तुम्हाला क्रिकेटच्या बॅटची जाहिरात येईल. म्हणजे तुमची सगळी माहिती जाहिरातींसाठी वापरली जाते.आता खरं काय आणि खोटं काय हे LG आणि त्या रिसर्चरमध्येच कळेल. पण एक गोष्ट नक्की की स्मार्ट टीव्ही घेताना त्याचे प्रायव्हसी सेटिंग्ज एकदा नक्की चेक करा. गरज नसेल तर माईकचा पर्याय बंद करून टाका.
Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर