Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कर्जतमध्ये शिंदे गटाला धक्का! गणेश मुंढेंचा समर्थकांसह उबाठात प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार

प्रसिद्ध उद्योजक गणेश मुंढे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उबाठा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी टोरंट प्रकल्पावरून टीका करण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2026 | 01:13 PM
Raigad News: कर्जतमध्ये शिंदे गटाला धक्का! गणेश मुंढेंचा समर्थकांसह उबाठात प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार

Raigad News: कर्जतमध्ये शिंदे गटाला धक्का! गणेश मुंढेंचा समर्थकांसह उबाठात प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार

Follow Us
Follow Us:
  • शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांचे जावई तथा प्रसिद्ध उद्योजक गणेश मुंढे यांचा उबाठा पक्षात जाहीर प्रवेश
  • उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांची ५०-५० च्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका
  • दिवाळी नंतर मोठा मेळावा आयोजित करण्यात येईल असे नितीन सावंत म्हणाले
कर्जत: कर्जत वेणगाव परिसरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांचे जावई तथा प्रसिद्ध उद्योजक गणेश मुंढे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उबाठा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. “आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी स्वागृही परतलो आहोत”, अशी भावना यावेळी गणेश मुंढे यांनी व्यक्त केली. शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत पक्षात त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असा शब्द दिला.

Chandrapur News: चिमूरमध्ये ७ कोटींच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह! चौकशी करण्याची नागरिकांची मागणी; नेमकं प्रकरण काय?

शिवसेना उबाठा पक्षाच्या ‘शिवालय’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळ्याला उपनेते बबन पाटील, मावळ संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुवर्णा जोशी, जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे, उपसभापती चित्रा ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  (फोटो सौजन्य – AI Created) 

टोरंट प्रकल्पावरून नितीन सावंतांची टिकेची झोड

“हल्ली आमदारांना शिवसेनेबद्दल जास्तच प्रेम वाटू लागले आहे. मात्र ते गोव्याला टेबलावर नव्हे तर शिवसैनिकांच्या हृदयावर नाचले, तेव्हा शिवसैनिक आठवले नाहीत. हे आम्ही विसरू शकत नाही. टोरंटला सर्व थरांतून विरोध होत आहे. या प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे तालुका भकास होणार आहे.”, असं म्हणत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंतांनी टोरंट प्रकल्पावरून टिकेची झोड उठवली.

५०-५० च्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका

उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी ५०-५० च्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “मध्यंतरी फिफ्टी फिफ्टीचा आवाज ऐकू आला होता. आम्ही त्यामध्ये नाही. निष्ठावंत शिवसैनिक कधीच मॅनेज होणार नाही. आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. गणेश मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे आपली ताकद निश्चित वाढणार आहे. भविष्यातही विविध ग्रामपंचायतींमधून प्रमुख कार्यकत्यांचे पक्ष प्रवेश होणार आहेत. दिवाळी नंतर मोठा मेळावा आयोजित करण्यात येईल असे जाहीर केले.

बबन पाटील यांचे आवाहन

“शिवसेना हा अथांग समुद्र आहे, काहीजण गेल्याने फरक पडत नाही. ज्यांना पश्चाताप झाला आहे, त्यांनी लवकरात लवकर स्वगृही यावे”, असे आवाहन करत टोरंट प्रकल्पाविरोधात उद्धव व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात तीव्र लढा उभारला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

आम्ही उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शिवसैनिकांच्या विचारांशी प्रामाणिक राहून काम करण्यासाठी स्वगृही आलो आहोत. आगामी काळात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण ताकदीने झटणार. – गणेश मुंढे, प्रसिद्ध उद्योजक

नियत कोणालाही सोडत नाही. ज्यांना आपण मोठे केले, ते सोडून गेले त्यांची अवस्था बिकट होणार आहे. शिवसैनिकांनी काळजी करू नका, शिवसेनेचे सुवर्णदिन लवकरच येत असून टोरंट प्रकल्पाविरोधात आम्ही संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरू.- बबन पाटील, उपनेते, उबाठा

Central Railway: अरे देवा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलला ब्रेक, ठाणे-मुलुंड आणि कांजूरमार्ग-भांडुपदरम्यान सिग्नल बिघाड

सर्वांनी एकत्र या!

आगामी निवडणुकीत कर्जत, पनवेल आणि पेणमधून शिवसेनेचे आमदार विजयी होतील, असा विश्वास मनोहर भोईर यांनी व्यक्त केला. तर शिवसेना हा विचारांचा पक्ष असून मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन प्रसाद भोईर यांनी केले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Political setback for shinde sena in karjat ganesh mundhe joins uddhav thackerays shiv sena ubt hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chinmay Mandlekar: रील स्टार श्रद्धा पवारला मालिकेत संधी फक्त फॉलोअर्समुळे? चिन्मय मांडलेकरने सांगितला ऑडिशनचा किस्सा
1

Chinmay Mandlekar: रील स्टार श्रद्धा पवारला मालिकेत संधी फक्त फॉलोअर्समुळे? चिन्मय मांडलेकरने सांगितला ऑडिशनचा किस्सा

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण
2

PUNE News: भाकड जनावरांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत द्या; दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यात उपोषण

Chandrapur News: चिमूरमध्ये ७ कोटींच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह! चौकशी करण्याची नागरिकांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3

Chandrapur News: चिमूरमध्ये ७ कोटींच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह! चौकशी करण्याची नागरिकांची मागणी; नेमकं प्रकरण काय?

Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा
4

Bepanwah Movie: अहान पांडे-शर्वरीची ‘बेपरवाह’ झेप! यशराज फिल्म्सकडून नव्या सिनेमाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.