Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta Waterwarth Project: भारताचं डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर होणार अधिक मजबूत, मेटा समुद्राखाली टाकणार जगातील सर्वात लांब केबल

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी मेटा जगातील सर्वात लांब समुद्राखालील केबल नेटवर्क टाकण्याची तयारी करत आहे. या प्रोजेक्टमुळे भारतात डिटीटल क्षेत्रात वेगाने पुढे जाईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2025 | 09:31 AM
Meta Waterwarth Project: भारताचं डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर होणार अधिक मजबूत, मेटा समुद्राखाली टाकणार जगातील सर्वात लांब केबल

Meta Waterwarth Project: भारताचं डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर होणार अधिक मजबूत, मेटा समुद्राखाली टाकणार जगातील सर्वात लांब केबल

Follow Us
Close
Follow Us:

फेसबुकची आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने आता एका नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. मेटाने ‘प्रोजेक्ट वॉटरवर्थ’ या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. या प्रोजेक्टचा भारताला सर्वाधिक फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मेटाने भारताला त्यांच्या एका प्रमुख सागरी प्रकल्पात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे.

Android युजर्ससाठी गुड न्यूज! सर्व स्मार्टफोन्स आणि टिव्हीवर मिळणार Apple TV ची मज्जा, कंपनीने केली घोषणा

या प्रकल्पाअंतर्गत जगातील पाच खंडांना मरीन इंटरनेट केबलद्वारे जोडण्याची योजना आहे. यासाठी, मेटा या पाच खंडांमध्ये 50,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची अंडरसी केबल टाकणार आहे. हा एक अब्जावधी डॉलर्सचा प्रकल्प आहे, ज्यामध्ये अनेक वर्षे गुंतवणूक केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका भेटीदरम्यान मेटाने या महत्त्वाच्या कराराची घोषणा केली होती. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आता लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. ‘प्रोजेक्ट वॉटरवर्थ’ हा भारत, अमेरिका आणि इतर देशांना जोडेल. यामुळे भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना गती मिळेल आणि देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे मेटाचे म्हणणे आहे. अहवालानुसार, हे नेटवर्क अमेरिका, ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका आणि इतर प्रमुख प्रदेशांसह 5 खंडांना जोडेल. हे नेटवर्क भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) सेवा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल .

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप सारखी अ‍ॅप्स मेटाच्या मालकिचे आहेत. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. अशा परिस्थितीत, भारत ही मेटासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे मेटाच्या या अ‍ॅप्सचे मंथली यूजर्स एक अब्जाहून अधिक आहेत. हा प्रकल्प खूप मोठा आहे आणि तो बांधण्यासाठी अनेक वर्षे लागतील. या केबलमुळे जगभरात डिजिटल कम्यूनिकेशन खूप जलद होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

प्रोजेक्ट वॉटरवर्थ नक्की काय आहे?

14 फेब्रुवारी रोजी, मेटाने प्रोजेक्ट वॉटरवर्थची घोषणा केली. या प्रकल्पात अनेक अब्ज रुपये गुंतवले जातील. हा प्रकल्प या वर्षी सुरू होईल. हे पाच खंडांना जोडेल, ज्यामुळे हा जगातील सर्वात लांब अंडरसी केबल प्रकल्प बनेल. हा एक खूप मोठा प्रकल्प आहे, ज्यामध्ये समुद्राच्या आत एक खूप लांब केबल टाकली जाईल. या केबलमुळे भारत जगातील अनेक देशांशी जोडला जाईल. यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढेल आणि भारत डिजिटल देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल.

Realme GT 7 Pro Racing Edition: तगडा क्वालकॉम प्रोसेसर आणि पावरफुल बॅटरीसह लाँच झाला Realme चा स्वस्त स्मार्टफोन

मेटाचा अंडरवॉटर केबल प्रकल्प हा भारताच्या केंद्रस्थानी असलेला 18 वा प्रकल्प असेल. इंटरनेट चालविण्यासाठी अंडरसी केबल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. या केबल्स देशांना एकमेकांशी जोडतात. स्थानिक टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या ग्राहकांना इंटरनेट सुविधा देण्यासाठी पाण्याखालील केबल्सशी जोडतात.

मेटाच्या प्रवक्त्याने काय म्हटले आहे?

मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मेटा भारतात गुंतवणूक करत आहे. कंपनी भारत, अमेरिका आणि इतर ठिकाणांना जोडण्यासाठी जगातील सर्वात लांब, हाय कॅपेसिटी असलेली आणि एडवांस्ड अंडरसी केबल प्रकल्प आणत आहे. डिजिटल सेवांच्या वाढत्या मागणीमुळे प्रेरित होऊन हा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे.

Web Title: Meta announces project waterworth to enhance global connectivity tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • meta
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
2

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
3

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
4

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.