Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta चे नवे AI Image Generator ‘Muse Image’ लाँच; आकर्षक फोटो तयार करण्यासाठी CEO ने सांगितल्या खास टिप्स

Meta ने आपले पहिले AI इमेज जनरेटर 'Muse Image' सादर केले आहे. अधिक वास्तवदर्शी आणि आकर्षक फोटो तयार करणाऱ्या या टूलसोबत Meta च्या AI प्रमुखांनी सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी काही खास टिप्सही शेअर केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2026 | 01:00 PM
Meta चे नवे AI Image Generator 'Muse Image' लाँच; आकर्षक फोटो तयार करण्यासाठी CEO ने सांगितल्या खास टिप्स

Meta चे नवे AI Image Generator 'Muse Image' लाँच; आकर्षक फोटो तयार करण्यासाठी CEO ने सांगितल्या खास टिप्स

Follow Us
Follow Us:
  • Meta ने ‘Muse Image’ नावाचे पहिले AI इमेज जनरेटर लाँच केले आहे.
  • Self-Refinement, Multi-Reference Composition आणि Multi-Turn Editing यांसारखी प्रगत AI फीचर्स यात उपलब्ध आहेत.
  • Instagram Stories आणि WhatsApp Meta AI मध्येही या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या मेटाने आता आपले पहिले AI इमेज जनरेटर ‘Muse Image’ सादर केले आहे. या नव्या AI मॉडेलच्या मदतीने अधिक वास्तवदर्शी, वैयक्तिक आणि उच्च दर्जाच्या प्रतिमा तयार करता येतील, असा कंपनीचा दावा आहे. Meta च्या AI विभागाने विकसित केलेल्या या मॉडेलचे नेतृत्व कंपनीचे चीफ AI ऑफिसर अलेक्झांडर वँग करत आहेत.

Jio Recharge Plan: Jio चा अवघ्या ५५ रुपयांचा धमाकेदार प्लॅन! मोबाईलवर पाहू शकता १००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल

या नव्या AI टूलच्या लॉन्चनंतर अलेक्झांडर वँग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काही महत्त्वाच्या सूचना शेअर केल्या आहेत. त्यानुसार, Muse Image मधून अधिक चांगले परिणाम मिळवायचे असतील तर वापरकर्त्यांनी स्वतःचे फोटो अपलोड करावेत. तसेच ट्रेंडिंग कंटेंटचा वापर करावा आणि मित्रांना टॅग केल्यास AI अधिक संदर्भासह आकर्षक फोटोज तयार करू शकते. हे टूल केवळ मनोरंजनासाठी नसून इंस्टाग्राम स्टोरीज, सोशल मीडिया पोस्ट आणि व्हाॅट्सअॅप वरील दैनंदिन वापर लक्षात घेऊन विकसित करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Muse Image मध्ये कोणती खास वैशिष्ट्ये?

Meta च्या माहितीनुसार, Muse Image मध्ये अनेक प्रगत AI फीचर्स देण्यात आले आहेत. Self-Refinement या सुविधेमुळे AI स्वतः तयार केलेल्या प्रतिमेचे विश्लेषण करून ती अधिक दर्जेदार बनवू शकते. Multi-Reference Composition च्या मदतीने वेगवेगळ्या छायाचित्रांमधील घटक एकत्र करून नवीन फोटोज तयार करता येते. तर Multi-Turn Editing फीचरमुळे एकाच प्रतिमेत अनेक वेळा बदल करून इच्छित परिणाम मिळवणे शक्य होते.

Sony Bravia 9 II ची दमदार एंट्री! AI फीचर्ससह मिळणार जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव, जाणून घ्या वैशिष्ट्य

याशिवाय Instagram Stories साठी ३० हून अधिक नवीन AI इफेक्ट्स या मॉडेलवर आधारित असतील. तसेच WhatsApp मधील Meta AI चॅटमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे AI च्या मदतीने फोटो तयार करणे आणि संपादित करणे आता अधिक सोपे आणि प्रभावी होणार आहे.

 

Web Title: Meta muse image ai generator launch tips for better ai photos marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • meta
  • Meta AI
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
1

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
2

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
3

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
4

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.