Sony Bravia 9 II ची दमदार एंट्री! AI फीचर्ससह मिळणार जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव, जाणून घ्या वैशिष्ट्य
सोनी इंडियाने आपल्या प्रीमियम टेलिव्हिजन पोर्टफोलिओमध्ये नवीन ब्राव्हिया ९II लॉन्च केला आहे. हा फ्लॅगशिप टू आरजीबी टेलिव्हिजन असून, उत्कृष्ट रंग, जबरदस्त ब्राइटनेस आणि सिनेमासारखा अनुभव देण्यासाठी तो तयार करण्यात आला आहे. नाव्हिया ९II मध्ये सोनीचे अत्याधुनिक आरजीबी बॅकलाइट मास्टर ड्राइव्ह प्रो तंत्रज्ञान देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या एलईडी स्वतंत्रपणे नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे स्क्रीनवर अधिक अचूक रंग, खोल काळा रंग आणि उत्तम कॉन्ट्रास्ट पाहायला मिळतो.(फोटो सौजन्य – AI)
कंपनीच्या मते, खोलीत जास्त प्रकाश असतानाही कोणत्याही कोनातून पाहिल्यास चित्रातील रंग नैसर्गिक आणि स्पष्ट दिसतात. या टीव्हीमध्ये एक्सआर कॉग्निटिव्ह प्रोसेसर देण्यात आला आहे, जो प्रत्येक दृश्याचे विश्लेषण करून रंग, ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट आपोआप सुधारतो.यासोबतच एक्सआर कॉन्ट्रास्ट बूस्टर, आरजीबी ट्रायल्यूमिनस मॅक्स आणि स्मूद कलर ग्रेडेशन यांसारख्या तंत्रज्ञानामुळे चित्राचा दर्जा अधिक प्रभावी बनतो. उत्तम व्हिज्युअल अनुभवासाठी ब्राव्हिया ९॥ मध्ये इमर्सिव्ह ब्लॅक स्क्रीन प्रो देण्यात आली आहे.
ही स्क्रीन बाहेरील प्रकाशाचे प्रतिबिब कमी करते आणि गडद दृश्यांमध्येही | बारकावे स्पष्ट दाखवते. ऑडिओसाठी यात अकौस्टिक मल्टी-ऑडिओ+ तंत्रज्ञान देण्यात आले असून, स्क्रीनवरील दृश्यांनुसार आवाजाचा अधिक वास्तव अनुभव मिळतो, ब्राव्हिया ९।। मध्ये डॉल्बी व्हिजन, डॉल्बी ॲटमॉस, डीटीएस एक्स आणि आयमॅक्स एन्हांस्ड यांसारख्या प्रीमियम फीचर्सचा सपोर्ट आहे.
यामध्ये गुगल टीव्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध असून, भविष्यात सॉफ्टवेअर अपडेटद्वारे जेमिनी एआय फीचरही उपलब्ध होणार आहे. सोनीने ब्राव्हिया ९।। सोबत ब्राव्हिया ७।। मॉडेलदेखील टू आरजीबी तंत्रज्ञानासह सादर केले आहे.दोन्ही मॉडेल्स मोठ्या स्क्रीन पर्यायांमध्ये उपलब्ध असून, घरातील प्रीमियम मनोरंजनाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.ब्राव्हिया ९।। मध्ये प्रीमियम डिझाइन, मिराज स्टैंड, लपवलेले केबल मॅनेजमेंट आणि आधुनिक रिमोट फीचर्स देण्यात आले आहेत.सोनीचा टू आरजीबी टीव्ही पोर्टफोलिओ ५५ इंच ते ८५ इंच स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध असेल.






