Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युजर्सच्या विरोधानंतर Meta चा मोठा यू-टर्न! Instagram वरील AI इमेज फीचर अखेर हटवले, वाचा संपूर्ण प्रकरण

Instagram AI Feature Removed: इंस्टाग्रामवरील AI फीचरबाबत वाढत्या वादानंतर मेटाने मोठा निर्णय घेतला आहे. यूजर्सच्या गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने कंपनीने Muse AI टूल प्लॅटफॉर्मवरून हटवले असून, भारत सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2026 | 09:34 AM
युजर्सच्या विरोधानंतर Meta चा मोठा यू-टर्न! Instagram वरील AI इमेज फीचर अखेर हटवले, वाचा संपूर्ण प्रकरण

युजर्सच्या विरोधानंतर Meta चा मोठा यू-टर्न! Instagram वरील AI इमेज फीचर अखेर हटवले, वाचा संपूर्ण प्रकरण

Follow Us
Follow Us:
  • यूजर्सच्या तीव्र विरोधानंतर मेटाने इंस्टाग्रामवरील AI टूल Muse हटवण्याचा निर्णय घेतला.
  • भारत सरकारनेही या फीचरची दखल घेत चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
  • गोपनीयता आणि परवानगीच्या मुद्द्यांमुळे हे AI फीचर वादाच्या केंद्रस्थानी आले आहे.
इंस्टाग्राम देशातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. रिल्स-पोस्ट शेअर करण्यापासून नवीन लोकांसोबत जोडण्यापर्यंत या ॲपचा वापर केला जातो. या ॲपचे करोडो यूजर्स आहेत. या करोडो यूजर्ससाठी कंपनी वेळोवेळी नवीन फीचर्स घेऊन येत असते. अलीकडेच मेटाने या ॲपमध्ये एआय जनरेशन टूल Muse रोलआउट केले होते. मात्र यूजर्सकडून या टूलचा विरोध केला जात आहे. यूजर्सचा हाच विरोध पाहता मेटाने आता हे एआय टूल इंस्टाग्रामवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Samsung ची लोकप्रिय Galaxy Z Flip सीरीज होणार बंद? टिप्स्टरने दिले महत्त्वाचे संकेत, वाचा सविस्तर

मीडिया रिपोर्टनुसार, मेटाने त्यांच्या अधिकृत ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, कंपनीने हे फीचर यूजर्सना एक नवीन क्रिएटिव टूल देण्याच्या हिशोबाने डिझाईन केले होते. याशिवाय या टूलद्वारे यूजर्स ठरवू शकतात की त्यांची पोस्ट एआयच्या वापरासाठी जाणार की नाही. मात्र यूजर्सनी या टूलला विरोध केल्यामुळे हे फीचर आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Muse Image चे इतर AI इमेज जनरेशन सिस्टिम आधीसारखेच उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

भारत सरकारने काय म्हटलं?

हे प्रकरण भारत सरकारने गांभीर्याने घेतले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) म्हटले आहे की, सरकार या फीचरची चाचणी करणार आहे. त्यांनी सांगितलं आहे की, जर तक्रारी दाखल झाल्या तर संपूर्ण प्रकरण भारताच्या कायद्यांतर्गत पाहिले जाईल. भारत सरकार बऱ्याच काळापासून डीपफेक आणि परवानगिशिवाय तयार करण्यात आलेल्या AI फोटोंवर कारवाई करत आहे. यामुळे आता इंस्टाग्रामचे हे फीचर देखील भारतासाठी गांभीर्याची बाब आहे. यापूर्वी देखील एआय टूल्सबाबत सरकारने अनेक कंपन्यांकडून उत्तरं मागितलं आहे.

जगभरातून झाला विरोध

इंस्टाग्रामवरील या फीचरचा विरोध केवळ सामान्य यूजर्सनीच केला नाही तर अमेरिकेतील कलाकारांची संघटना, SAG-AFTRA ने आपल्या सदस्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. मोठी टॅलेंज एजेंसी CAA ने म्हटलं आहे की, कोणत्याही व्यक्तिचा चेहरा, नाव, आवाज किंवा त्याचा फोटो त्याच्या स्पष्ट परवानगिशिवाय एआय मॉडेलमध्ये वापरला जाऊ शकत नाही. अनेक गोपनीयता संघटनांनी देखील मेटावर टीका केली आणि म्हटले की AI कंपन्या लोकांचे वैयक्तिक फोटो केवळ डेटा म्हणून वापरत आहेत.

यूजर्सनी का केला या फीचरचा विरोध?

पब्लिक इंस्टाग्राम अकाऊंटना या फीचरमध्ये आधीच समाविष्ट करण्यात आले होते. याचा अर्थ असा असा आहे की, जर एखाद्या यूजरला त्याचे फोटो एआयच्या वापरासाठी द्यायचे नसतील तर त्याला सेटिंगमध्ये जाऊन काही बदल करावे लागत होते. याशिवाय, मेटा कोणत्या यूजरला सांगत देखील नव्हते की, त्याच्या प्रोफाईलचा वापर कोणी एआय ईमेज तयार करण्यासाठी केला आहे. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांचे फोटो त्यांच्या परवानगिशिवाय वापरल्याने चिंता देखील निर्माण झाली होती. प्रायव्हेट अकाऊंट्स आणि 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या यूजर्सचे अकाऊंट या फीचरमध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हतं.

भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर

Muse Image काय आहे?

Muse Image हे मेटाचे एक नवीन एआय टूल आहे, जे सामान्य भाषेत दिलेल्या सूचनांच्या आधारे ईमेज तयार करते. याच्या मदतीने फोटोमध्ये बदल केले जाऊ शकतात, कोणतीही वस्तू हटवली जाऊ शकते, फोटोचे बॅकग्राऊंड बदलले जाऊ शकते, जुन्या फोटोची क्वालिटी सुधारली जाऊ शकते आणि खोलीचा फोटो पाहून नवीन इंटीरियर डिझाईन केले जाऊ शकते.

Web Title: Meta removes instagram muse ai tool after user backlash india to review privacy concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • instagram
  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
1

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
2

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर
3

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
4

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.