Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

गूगल प्ले स्टोअरवर अलीकडेच एक बनावट क्रोम ॲप आढळल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजेच हे ॲप 1,00,000 हून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. या ॲपमध्ये वेब ब्राउझिंगऐवजी एआय (AI) अवतारांसह चॅट-स्टाईल इंटरफेस आणि मोठ्या प्रमाणात जाहिराती देण्यात आल्या होत्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 16, 2026 | 12:16 PM
काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच... प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच... प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • गूगल क्रोमसारखा दिसणारा दुसरा एक संशयास्पद ॲप गूगल प्ले स्टोअरवर आढळला
  • 1,00,000 हून अधिक लोकांनी डाऊनलोड केले बनावट ॲप
  • बनवाट ॲप एका वेगळ्या ॲप डेव्हलपरद्वारे लिस्ट करण्यात आला
तुम्ही अलीकडेच गूगल प्ले स्टोअरवरून गूगल क्रोम डाऊनलोड केले आहे का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही डाऊनलोड केलेले गूगल क्रोम फेक म्हणजेच बनावट असण्याची शक्यता आहे. कारण अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, गूगल क्रोमसारखा दिसणारा दुसरा एक संशयास्पद ॲप गूगल प्ले स्टोअरवर पाहायला मिळाला आहे. या ॲपचे नाव आणि लोगो कथितपणे खऱ्या गूगल क्रोम ॲपसारखा असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र हा ॲप दुसऱ्या डेव्हलपरने तयार केला होता. रिपोर्टनुसार, हा बनावट ॲप गूगलने हटवण्यापूर्वी त्याला 1,00,000 हून अधिक लोकांनी डाऊनलोड केले असल्याचे सांगितलं जात आहे.

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

अधिक चिंताजनक बाब म्हणजे, या ॲपमध्ये वेब ब्राउझिंगऐवजी एआय (AI) अवतारांसह चॅट-स्टाईल इंटरफेस आणि मोठ्या प्रमाणात जाहिराती देण्यात आल्या होत्या; यामुळे गुगलच्या ॲप तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

बनावट क्रोम ॲप

शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, गुगल क्रोमशी हुबेहूब मिळता-जुळता असलेला हा बनावट ॲप अधिकृत गुगल प्ले स्टोअरवरील सर्च रिजल्ट्समध्ये पाहायला मिळाला आहे. या बनावट ॲपचे नाव आणि लोगो ओरिजीनल क्रोम ॲपसारखाच होता. मात्र हा बनवाट ॲप एका वेगळ्या ॲप डेव्हलपरद्वारे लिस्ट करण्यात आला होता, ज्याचे नाव ‘Hizbartech’ आहे. पोस्टमध्ये पुढे सांगितलं आहे की, हे बनावट ॲप सर्च रिजल्ट्समध्ये ‘स्पॉन्सर्ड’ (प्रायोजित) लिस्टिंग म्हणून दिसत होते आणि ते अगदी अस्सल क्रोम ॲपच्या वरच्या बाजूला होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोस्टवर करण्यात आलेल्या काही कमेंट्सनुसार, हे ॲप पहिल्यांदा 22 ऑगस्ट रोजी बॉल बाऊंस नावाचे गेमिंग ॲप म्हणून लिस्ट झाले होते. यानंतर 30 सप्टेंबर रोजी या ॲपचे नाव आणि लोगो बदलून गूगल क्रोमसारखेच करण्यात आले. ज्या यूजर्सनी हे ॲप इंस्टॉल केले आहे, त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करताना कथितपणे सांगितलं की, हा ॲप म्हणजे कोणताही गेम किंवा कोणते ब्राऊझर नव्हते. याऐवजी, हे ॲप एआय (AI) अवतारांसह एक चॅट-स्टाईल इंटरफेस ओपन करत होते आणि स्क्रीनवर जाहिराती दिसत होत्या. या ॲपने कोणते पासवर्ड्स चोरी केले आहेत किंवा फोनमध्ये मालवेअर इंस्टॉल केला आहे, याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै

प्ले स्टोअरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

नुकत्याच घडलेल्या या प्रकरणानंतर आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, या ॲपने गूगलचे सेफ्टी चेक्स कसे पास केले, तसेच या ॲपच्या नावात आणि लोगोमध्ये झालेल्या बदलांचे योग्य पद्धतीने रिव्ह्यू करण्यात आले नाही का? दुसरी चिंता या ॲपच्या पेड प्रमोशनच्या वापराबाबत आहे. कारण एका सुप्रसिद्ध गुगल उत्पादनाशी साधर्म्य असूनही, या लिस्टिंगने अव्वल स्थान मिळवले. मात्र आता हे ॲप गूगल प्ले स्टोअरवरून हटवले असल्याचे सांगितलं जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Play Store वर बनावट Google Chrome ॲप आढळले होते का?

    Ans: होय. दिलेल्या रिपोर्टनुसार, Google Chrome सारखे नाव आणि लोगो असलेले संशयास्पद ॲप Google Play Store वर आढळले होते. हे ॲप दुसऱ्या डेव्हलपरने प्रकाशित केले होते.

  • Que: बनावट Google Chrome ॲपचे नाव काय होते?

    Ans: रिपोर्टनुसार, या ॲपचे नाव आणि लोगो अधिकृत Google Chrome ॲपसारखे होते. हे ॲप ‘Hizbartech’ या डेव्हलपरच्या नावाने लिस्ट करण्यात आले होते.

  • Que: बनावट Chrome ॲप किती लोकांनी डाउनलोड केले होते?

    Ans: दिलेल्या रिपोर्टनुसार, हे ॲप Google Play Store वरून हटवण्यापूर्वी १ लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले होते.

Web Title: Fake google chrome app found on play store downloaded over 100000 times before removal hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Google Chrome
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये
1

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
2

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
3

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
4

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.