Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक प्‍लॅटफॉर्म्‍सवर इंडियन गेम्सची एंट्री! MIB, IEIC आणि WinZO ने लाँच केलं टेक ट्रायम्‍फ सीझन 3

टीटीपी भारतातील गेमिंग स्टार्टअप्सना गुंतवणूक, मार्गदर्शन व जागतिक एक्‍स्‍पोजरद्वारे सक्षम करते. एमआयबीचे सचिव संजय जाजू म्हणाले, टीटीपी भारताच्या गेमिंग आणि टेक इनोव्‍हेशन्‍सना जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी मदत करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 11, 2025 | 12:57 PM
जागतिक प्‍लॅटफॉर्म्‍सवर इंडियन गेम्सची एंट्री! MIB, IEIC आणि WinZO ने लाँच केलं टेक ट्रायम्‍फ सीझन 3

जागतिक प्‍लॅटफॉर्म्‍सवर इंडियन गेम्सची एंट्री! MIB, IEIC आणि WinZO ने लाँच केलं टेक ट्रायम्‍फ सीझन 3

Follow Us
Close
Follow Us:

इंटअ‍ॅक्टिव्‍ह एंटरटेन्‍मेंट अँड इनोव्‍हेशन कौन्सिल (आयईआयसी) ने क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन – 1 (Create in India Challenge Season – 1)चा भाग म्‍हणून मिनिस्‍ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग (एमआयबी) आणि विंझो गेम्‍सच्या सहयोगाने टेक ट्रायम्‍फ प्रोग्राम (Tech Triumph Program) (टीटीपी) लाँच केला आहे. वर्ल्‍ड ऑडिओ व्हिज्‍युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES) च्‍या दिशेने वाटचाल करत हे चॅलेंज पहिल्‍यांदाच वेव्‍ह्जच्‍या आंतरराष्‍ट्रीय प्‍लॅटफॉर्मवर भारतातील गेमिंग टॅलेंटला ओळखेल आणि सन्‍मानित करेल.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ११४ व्या मन की बात भाषणात भारतातील कन्‍टेन्‍ट क्रिएटर अर्थव्यवस्थेला या आव्हानांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. त्याच भाषणात व ११५ व्या मन की बातमध्ये, माननीय पंतप्रधानांनी नोकऱ्यांचे वेगाने बदलणारे स्वरूप आणि गेमिंगसारख्या सर्जनशील क्षेत्रातील वाढत्या संधींवर भर दिला. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, त्यांनी भारतातील गेमिंग टॅलेंटला जागतिक गेमिंग प्रेक्षकांसाठी भारतात गेम तयार करण्याचे आवाहन केले.

Apple iPhone: आगामी iPhone सिरीजची लाँच डेट लीक! नवीन डिझाईन आणि दमदार फीचर्ससह ‘या’ महिन्यात करणार एंट्री

माननीय पंतप्रधानांनी दिलेली ही दिशा टीटीपीला अधिक प्रेरित करते. जागतिक गेमिंग बाजारपेठ सध्या ३०० अब्ज डॉलर्स आहे आणि अलीकडील अहवालांनुसार, भारत २०३४ पर्यंत ३.१ अब्ज डॉलर्सवरून ६० अब्ज डॉलर्सची गेमिंग बाजारपेठ बनू शकतो. टीटीपी उपक्रमाचा भारताच्या गेमिंग उद्योगाला नाविन्‍यता, उद्योजकता व निर्यात-सुसज्‍ज तंत्रज्ञान आणि आयपीला चालना देऊन जागतिक गेमिंग बाजारपेठेत मोठा वाटा संपादित करण्‍यास साह्य करण्‍याचा, तसेच नवीन संधी निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे. १७ ते २१ मार्च दरम्यान सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स (जीडीसी) २०२५ मध्ये आणि नंतर भारतातील वेव्‍ह्ज येथे निवडक गेम डेव्हलपर्स आणि टेक इनोव्हेटर त्यांचे टॅलेंट सादर करतील.

टीटीपी भारतातील गेमिंग स्टार्टअप्सना गुंतवणूक, मार्गदर्शन आणि जागतिक एक्‍स्‍पोजरद्वारे सक्षम करते. निवडलेल्या सहभागींना त्यांचे गेम जागतिक प्रेक्षकांसमोर दाखवण्‍याची संधी मिळेल. या सीझनमध्‍ये ही स्पर्धा पीसी, मोबाइल आणि कन्सोल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गेमिंग स्टुडिओ, डेव्हलपर्स आणि ईस्पोर्ट्स संस्थांसाठी तसेच पेमेंट, सुरक्षा, प्रतिबद्धता, मुद्रीकरण आणि इतर गेमिंग सपोर्ट सोल्यूशन्समधील स्टार्टअप्ससाठी खुली आहे. हे चॅलेंज देशांतर्गत तसेच आंतरराष्‍ट्रीय सहभागींसाठी खुले आहे आणि अर्ज करण्याची तारीख २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विविध पार्श्वभूमीतील निवडलेल्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रभावी प्रकल्पांमध्ये रूपांतरित करण्यासाठी मार्गदर्शन आणि निधीसाह्य देखील मिळेल.

निवड प्रक्रियेत तीन प्रमुख टप्पे आहेत. सहभागींना त्यांच्या नोंदी प्रारंभिक मूल्यांकनासाठी सादर करण्यास आवाहन केले जाते. शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार अंतिम मूल्यांकन फेरीत जातील, जेथे ते त्यांच्या संकल्पना तज्ञांच्या पॅनेलसमोर सादर करतील. त्यानंतर विजेत्यांना त्यांच्या आंतरराष्‍ट्रीय प्रदर्शनांसाठी तयारी करण्याकरिता मार्गदर्शकांच्या टीमकडून मार्गदर्शन मिळेल, जेणेकरून त्यांच्या संकल्पना जागतिक स्तरावर चांगल्या प्रकारे सादर केल्या जातील.

एमआयबीचे सचिव संजय जाजू म्हणाले, ”टेक ट्रायम्फ प्रोग्राम (टीटीपी) हा भारताच्या गेमिंग आणि टेक इनोव्‍हेशन्‍सना जागतिक स्तरावर चालना तयार करण्यात आला आहे. वेव्‍ह्ज व टीटीपीचे ध्‍येय समान आहे, ते म्‍हणजे: भारताच्या एव्‍हीजीसी-एक्‍सआर इकोसिस्टममध्ये नाविन्‍यता, सहकार्य आणि विकासाला चालना देणे. क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस सीझन १ चा भाग असलेला टीटीपी उदयोन्मुख स्टार्टअप्सना महत्वाची संसाधने आणि त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी जागतिक प्‍लॅटफॉर्म प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे. अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आमचा भारताच्या गेमिंग उद्योगाला नवीन उंचीवर नेण्याचा आणि तरुणांच्या सर्जनशील क्षमतेला संधी प्रदान करण्याचा मनसुबा आहे.”

आयईआयसीचे सल्लागार अभिषेक मल्होत्रा म्हणाले, ”हा प्रोग्राम गेमिंग इकोसिस्टममध्ये भारताच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक आहे आणि टॅलेंटना अधिक निपुण करण्यासाठी व त्यांना जागतिक दर्जापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रबळ प्‍लॅटफ्रॉर्म बनला आहे. हा प्रोग्राम भारताच्या क्षमता प्रदर्शित करण्‍यासोबत आमच्या इनोव्‍हेटर्सना आंतरराष्‍ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती, कनेक्शन आणि संधींसह सुसज्‍ज देखील करतो. सीझन ३ आतापर्यंतचे टीटीपीचे आमचे सर्वात प्रभावी एडिशन असणार आहे, जेथे आम्‍ही सहभागींसाठी निधीसाह्य, अधिक मार्गदर्शन व टूल्‍ससह संसाधनांमध्‍ये वाढ केली आहे, ज्यामुळे ते नाविन्यता आणण्यासाठी आणि जागतिक गेमिंग इकोसिस्टममध्ये वास्तविक मूल्य आणण्यासाठी सक्षम होतील.”

विंझोचे सह-संस्थापक पावन नंदा म्हणाले, ”टीटीपी नाविन्‍यता आणि महत्त्वाकांक्षेच्‍या टप्‍प्‍यावर आहे. विंझोमध्‍ये आमचा भारतातील गेमिंग स्‍टार्टअप्‍सना जागतिक स्‍तरावर स्‍पर्धा करताना आणि जिंकताना पाहण्‍याचा दृष्टिकोन आहे. हा प्रोग्राम या ध्‍येयाचे प्रतीक आहे. आम्‍ही स्‍थानिक टॅलेंटना निधीसाह्य, अत्‍याधुनिक संसाधने व जागतिक प्‍लॅटफॉर्म्‍स उपलब्‍ध करून देत निपुण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या संकल्‍पनांना यशस्‍वी उद्यमांमध्‍ये बदलता येईल. भारत डिजिटल गेमिंगमध्‍ये लीडर बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना या प्रोग्राममधून ‘क्रिएट इन इंडिया फॉर द वर्ल्‍ड’ तत्त्व दिसून येते, ज्‍याने स्थिर व जागतिक स्‍तरावर प्रभावी असलेल्‍या उद्योगासाठी पाया स्‍थापित केला आहे. आम्‍हाला या दृष्टिकोनाला सत्‍यात आणण्‍यासाठी आणि वेव्‍ह्ज सारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून भारतातील डिजिटल इकोसिस्‍टमला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी आयईआयसी व मिनिस्‍ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो.”

केवळ 6,499 रुपयांना उपलब्ध आहे Samsung चा हा शक्तिशाली स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज

टीटीपीच्‍या मागील एडिशन्‍समधील विजेत्‍यांनी (winners) जर्मनी व ब्राझीलमधील जीडीसी २०२४, गेम्‍सकॉम आणि ब्राझील शो यांसारख्‍या प्रतिष्ठित इव्‍हेण्‍ट्समध्‍ये त्‍यांचे गेम्‍स दाखवले आहेत, जेथे त्‍यांना उद्योग व सरकारच्‍या प्रतिष्ठित प्रमुखांकडून मार्गदर्शन मिळाले. यापूर्वीच्‍या एडिशन्‍समध्‍ये प्रतिष्ठित उद्योग व सरकार प्रमुखांचा सहभाग दिसून आला, जसे भारत सरकारचे माजी सचिव रोहित कुमार सिंग, ब्राझीलचे अ‍ॅम्‍बेसेडर सुरेश के. रेड्डी, इन्‍फो एजचे सह-संस्‍थापक संजीव भिकचंदानी आणि कलारी कॅपिटलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक राजेश राजू, ज्‍यांनी परीक्षक व मेन्‍टोर्स म्‍हणून भूमिका बजावली, तसेच सहभागींना बहुमूल्‍य कौशल्‍ये दिली. टीटीपीच्‍या तिसऱ्या सीझनसह भारतातील गेमिंग इकोसिस्‍टम आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍यास, तसेच डायनॅमिक व जागतिक स्‍तरावर मान्‍यताकृत ‘मेड इन इंडिया’ टेक उद्योग बनण्‍याच्‍या देशाच्‍या महत्त्वाकांक्षांना प्रगत करण्‍यास सज्‍ज आहे.

हा उपक्रम गेमिंग तंत्रज्ञान व बौद्धिक मालमत्तेमध्‍ये जागतिक पॉवरहाऊस बनण्‍याच्‍या भारताच्‍या दृष्टिकोनाची संलग्‍न आहे, ज्‍याला भारतातील एव्‍हीजीसी व एक्‍सआर क्षेत्रांचे पाठबळ आहे. ही क्षेत्रे आता देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेप्रती योगदान देत आहेत. फिक्‍की-ईवाय अहवालानुसार, भारतातील मीडिया क्षेत्रात डिजिटल व ऑनलाइन गेमिंगची अधिक वाढ झाली आहे.

Web Title: Mib ieic and winzo launch tech triumph season 3 indian games entered on global platform tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.