Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

MindTech Summit 2026: बंगळुरुमध्ये माईंडटेक समिट 2026 या ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले. हा ईव्हेंट 5 आणि 6 ऑक्टोबर अशा दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2026 | 11:54 AM
AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

Follow Us
Follow Us:
  • TANUH च्या वतीने दोन दिवसीय माइंडटेक समिट 2026 चे आयोजित
  • आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या युगातील मानसिक आरोग्य हा समिटमधील मुख्य विषय
आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआय आणि मानसिक आरोग्य यांच्या वाढत्या संबंधांवर चर्चा करण्यासाठी माईंडटेक समिट 2026 या ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. 5 आणि 6 ऑक्टोबर अशा दोन दिवसांसाठी या ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले. बंगळुरुमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये या ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले. TANUH (ट्रांसलेशनल एआई फॉर नेटवर्क्ड यूनिवर्सल हेल्थकेयर) यांच्या वतीने हे दोन दिवसीय समिट आयोजित करण्यात आले. या समिटमधील मुख्य विषय आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या युगातील मानसिक आरोग्य असा आहे.

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

माइंडटेक समिट 2026

‘माइंडटेक समिट 2026’च्या मुख्य वक्त्यांमध्ये हार्वर्डचे इप्सित वाहिया, कॉर्नेल टेकच्या तन्झिम चौधरी, नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटीचे ची-चुन (जेरेमी) ली आणि युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोचे डॉ. वेंकट भट यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, इप्सित वाहिया यांनी ‘सेंसरमधून मिळणाऱ्या माहितीपासून प्रत्यक्ष रुग्णसेवेपर्यंत एआय पोहोचवताना येणाऱ्या विविध अडचणी’ या विषयावर मुख्य भाषण दिले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

माइंडटेक समिट 2026 चा उद्देश

आयोजित करण्यात आलेल्या या समिटचा उद्देश मानसिक आरोग्य क्षेत्रात एआयच्या वाढत्या वापराबाबत चिकित्सक, संशोधक, तंत्रज्ञान तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि स्टार्टअप्स यांना एकाच मंचावर आणणे, असा आहे. आयोजकांनी सांगितलं की, मानसिक आरोग्याशी संबंधित एआयवर भारत आणि जगभरात रिसर्च, क्लिनिकल प्रॅक्टिस आणि टेक्नोलॉजीच्या स्तरावर काम केले जात आहे. मात्र या क्षेत्रांमध्ये चांगले समन्वय असणं गरजेचे आहे. आयोजित करण्यात आलेल्या या समिटमध्ये मुख्य भाषणे, परिसंवाद, तज्ञांची व्याख्याने आणि आरोग्य-तंत्रज्ञानातील उदयोन्मुख उपाययोजनांचे प्रदर्शन यांचा समावेश आहे.

Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस

अशी झाली कार्यक्रमाची सुरुवात

समिटच्या पहिल्या दिवशी सकाळी 8:30 ते 9:30 यादरम्यान रजिस्ट्रेशन करण्यात आले. यानंतर स्वागत समारंभ पार पडला. सकाळी सुमारे 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पहिले मुख्य सत्र सुरु झाले. या सत्रात, हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. इप्सित वाहिया यांनी “सेन्सर्सपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत: एआय चा आरोग्यसेवेत समावेश करण्यातील अनेक गुंतागुंतीचे पैलू” या विषयावर भाष्य केले.

सोप्या शब्दांत सागांयचे झाले तर सेंसरमधून मिळणाऱ्या माहितीपासून प्रत्यक्ष रुग्णसेवेपर्यंत एआय पोहोचवताना येणाऱ्या विविध अडचणी या विषयावर त्यांनी भाष्य केले. यानंतर ‘सीमा निश्चित करणं: मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका काय असावी?’ यावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली.

Web Title: Mindtech summit 2026 experts discuss the future of ai and mental healthcare at iisc bengaluru

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • tech event
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर
1

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
2

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
4

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.