
Flipkart Republic Day Sale: बजेटमध्ये बेस्ट डील! Motorola च्या या स्मार्टफोनवर बंपर ऑफर, 7 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह करा खरेदी
चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण
Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोन कंपनीने 25,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर सुमारे 26 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. म्हणजेच ग्राहकांना मोटोरोलाच्या या स्मार्टफोनच्या खरेदीवर सुमारे 7 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये या मोटोरोला स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये झाली आहे. प्रीमियम फीचर्सवाला हा स्मार्टफोन आता ग्राहकांना अतिशय कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ग्राहक 668 रुपयांच्या ईएमआय ऑफरचा फायदा घेऊन देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. ग्राहकांना तुम्ही हा फोन फक्त 668 रुपयांच्या EMI वर दरमहा खरेदी करू शकता, जो विशेषतः विद्यार्थी आणि पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. जुना स्मार्टफोन एक्सतेंज केल्यास ग्राहकांना आणखी बचत करण्याची संधी मिळणार आहे.
Motorola Edge 50 Fusion मध्ये प्लास्टिक फ्रेमसह इको-लेदर बॅक डिझाईन दिले आहे, ज्यामुळे डिव्हाईसला प्रिमियम लुक मिळतो. या फोनमध्ये IP68 रेटिंग आहे, ज्यामुळे फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. या डिव्हाईसमध्ये 6.7-इंच P-OLED कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनवर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 की प्रोटेक्शन दिले आहे. फोन अँड्रॉईड 14 वर आधारित आहे आणि या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 7s जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग दोन्ही स्मूद होते.
Tech Tips: एक क्लिक… आणि सगळं गायब! फोन Factory Reset कधी करावा? तुमचे एक पाऊल ठरू शकते मोठी चूक
फोटोग्राफीसाठी Motorola डिव्हाईसमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 13MP चा सेकेंडरी लेंस दिली आहे. फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे, जो व्हिडीओ कॉलिंग आणि सोशल मीडियासाठी बेस्ट आहे. या सर्व फीचर्समुळे हा स्मार्टफोन कमी किंमतीत एक चांगला पर्याय बनतो.