Tech Tips: एक क्लिक… आणि सगळं गायब! फोन Factory Reset कधी करावा? तुमचे एक पाऊल ठरू शकते मोठी चूक
स्मार्टफोनच्या वापरासोबतच त्याची स्पीड थोडी स्लो होणं अतिशय सामान्य आहे. आपण रोज फोनमध्ये अनेक फोटो, व्हिडीओ, फाईल्स सेव्ह करतो. विविध अॅप्सचा वापर करतो. यामुळे स्मार्टफोनमधील डेटा वाढतो आणि स्मार्टफोन स्लो होऊ लागतो. या स्मार्टफोन सोडवण्यासाठी फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडणं खरंच योग्य आहे का? मात्र, सत्य असं आहे की, स्मार्टफोनवरील प्रत्येक समस्येचा उपाय फॅक्ट्री रिसेट करणं नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रत्येक छोट्या समस्येसाठी स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करत असाल तर यामुळे इतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट केल्यानंतर सर्व महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप घेणं, डेटा पुन्हा ट्रांसफर करणं आणि स्मार्टफोनमधील सर्व अॅप्स पुन्हा इंस्टॉल करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय किचकट असते. जर तुम्ही वारंवार तुमचा स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करत असाल तर तुम्हाला ही सर्व प्रोसेस वारंवार फॉलो करावी लागेल आणि यामुळे तुमचा अनुभव पूर्ण खराब होऊ शकतो.
प्रत्येकवेळी स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट करणं योग्य नसतं. पण काही कठीण परिस्थितीत तुम्ही हा पर्याय निवडू शकता. उदारहणार्थ, जेव्हा तुम्हाला तुमचा फोन विकायचा असेल किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करत असाल तर अशावेळी तुम्ही फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडू शकता. अशा परिस्थितीत, तुमची वैयक्तिक माहिती इतर कोणाच्याही हाती लागू नये म्हणून फॅक्टरी रीसेट करणे खूप महत्वाचे आहे.
याशिवाय जर तुमचा स्मार्टफोन गरजेपेक्षा जास्त हँग होत असेल आणि तुम्हाला सतत सामान्य उपाय जसे कैश क्लियर करणं किंवा नको असलेले अॅप्स हटवणं अशी काम करावी लागत असतील तर अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडू शकता. कधीकधी, नवीन सॉफ्टवेअर अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर, तुमचा फोन पूर्वीपेक्षा हळू किंवा अधिक अस्थिर होतो. अपडेटनंतर समस्या कायम राहिल्यास, फॅक्टरी रीसेट केल्याने समस्या सोडवता येते. तसेच जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायरस किंवा मालवेयर गेला असेल किंवा एखाद्या थर्ड पार्टी वेबसाईटद्वारे डाऊनलोड केलेली फाईल तुमच्या स्मार्टफोनला नुकसान पोहोचवत असेल तर अशावेळी फॅक्ट्री रिसेटचा पर्याय निवडणं योग्य ठरतं. जेव्हा खरंच गरज असेल किंवा एखादी मोठी समस्या निर्माण झाली असेल तर तुम्ही फॅक्ट्री रिसेट करू शकता. पण सतत फॅक्ट्री रिसेट केल्यास स्मार्टफोनला नुकसान पोहोचू शकतं.






