चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण
Tech Tips: एक क्लिक… आणि सगळं गायब! फोन Factory Reset कधी करावा? तुमचे एक पाऊल ठरू शकते मोठी चूक
अमेरिकेतील इंडियानामध्ये राहणाऱ्या एका यूजरने दावा केला होता की, Samsung Galaxy S25 Plus रात्री चार्जिंगला लावला होता. पण चार्जिंगदरम्यान स्मार्टफोन आणि चार्जिंग केबल दोन्हीमध्ये ब्लास्ट झाला. या ब्लास्टमुळे घरात असलेल्या कार्पेटला आग लागली आणि क्षणातच संपूर्ण घरामध्ये धूर झाला. त्यामुळे कुटूंबातील सदस्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. या घटनेत एका मुलासह कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले. यूजरने दावा केला आहे की, त्याने कंपनीकडे सर्व डॉक्युमेंट्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये लोकल फायर डिपार्टमेंटचा रिपोर्ट देखील समाविष्ट आहे. (फोटो सौजन्य – X)
यूजर त्याचा फोन कंपनीच्या ओरिजिनल चार्जरने चार्ज करत होता. हे सिद्ध करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रं देखील कंपनीकडे सोपवण्यात आली आहेत. यूजरने हा चार्जर एका महिन्यापूर्वी खरेदी केला होता. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये घडली होती आणि यूजर दोन महिन्यांपासून या प्रकरणाबाबत कंपनीशी संपर्कात होता. आता अखेर या प्रकरणाबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे.
अँड्रॉइड अथॉरिटीने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेतील प्रवक्ताने सांगितलं आहे की, आमच्या लाखो सॅमसंग डिव्हाईसची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अत्यंत काळजी घेतो. आमच्या तपासात या घटनेचे विशिष्ट कारण आढळलेले नाही. आम्ही यूजरसोबत संपर्कात आहोत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. याशिवाय रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने स्मार्टफोनची किंमत, मालमत्तेचे नुकसान आणि वैद्यकीय तपासणीशी संबंधित अतिरिक्त खर्च देण्यास सहमती दर्शविली आहे. सॅमसंगने असेही स्पष्ट केले की हे एक वेगळे प्रकरण आहे आणि कंपनीला गॅलेक्सी S25 लाइनअपवर परिणाम करणारी कोणतीही व्यापक समस्या आढळलेली नाही. त्यामुळे यूजर्सना चिंता करण्याची गरज नाही.
Ans: होय, थोडं गरम होणं नॉर्मल आहे. पण फोन खूप जास्त तापत असेल, हाताला धरवत नसेल किंवा वास/आवाज येत असेल तर लगेच चार्जिंग बंद करा.
Ans: 2–3 वर्षे किंवा 500–800 चार्ज सायकल्स.
Ans: नाही. Samsung ची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी बॅटरी प्रोटेक्शनसह येते, जर ओरिजिनल चार्जर वापरला तर सुरक्षित आहे.






