मुकेश अंबानींची दिवाळी ऑफर! केवळ 12 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन या हा लॅपटॉप
सध्या लॅपटॉप प्रत्येकाची गरज बनला आहे. शाळा कॉलेजपासून अगदी जॉब करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला लॅपटॉपची गरज असते. असाईंटमेंट असो किंवा ऑफीसचं कामं, सर्वासाठी आपल्याकडे लॅपटॉप असणं आवश्यक आहे. पण लॅपटॉपच्या वाढत्या किंमतींमुळे अनेकदा लोकं स्वत:चा लॅपटॉप विकत घेत नाहीत. तुम्ही देखील प्रचंड किंमतीमुळे लॅपटॉपची खरेदी करत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी यांनी सर्वांसाठी दिवाळी ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहक केवळ 12 हजार रुपयांच्या किंमतीत JioBook खरेदी करू शकतात.
हेदेखील वाचा-पार्किंग आणि कार चोरीचं टेन्शन मिटलं, गुगल मॅपचं हे फीचर करणार तुम्हाला मदत
कमी बजेटमध्ये चांगला लॅपटॉप ऑप्शन शोधत असाल तर तुमच्यासाठी JioBook एक उत्तम पर्याय ठरू शकतो. JioBook 11 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता, ज्यावर आता मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. हा लॅपटॉप तुम्ही फक्त 12,890 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. Amazon.in किंवा Reliance Digital वरून तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करू शकता. JioBook 11 हा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
JioBook 11 लॅपटॉपमध्ये MediaTek 8788 CPU देण्यात आला आहे. हा लॅपटॉप JioOS वर आधारित आहे. JioBook 11 थेट 4G मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट केला जाऊ शकतो. तसेच तुम्ही हा लॅपटॉप थेट WiFi नेटवर्कशी देखील कनेक्ट करू शकता. हा लॅपटॉप 11.6 इंच स्क्रीन आणि 990 ग्रॅम वजनासह येतो. सध्या फक्त सिंगल ब्लू कलर व्हेरियंटमध्ये JioBook 11 लॅपटॉप उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये 64GB स्टोरेज आहे. तसेच 4GB रॅम देखील उपलब्ध आहे. लॅपटॉपची सरासरी बॅटरी 8 तास आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
हेदेखील वाचा-आयफोन युजर्ससाठी Apple Intelligence सोबत डिसेंबरमध्ये येणार iOS 18.2 अपडेट, बीटा चाचणी लवकरच सुरु होणार
JioBook 11 या लॅपटॉपवर 12 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. यासोबतच इन्फिनिटी कीबोर्ड आणि लॅपटॉपचा मोठा टचपॅडही देण्यात आला आहे. यामुळे तुमचं काम अधिक सोपं होणार आहे. हा लॅपटॉप तुम्ही फक्त 12,890 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. JioBook 11 ला Amazon वर 3.2 रेटिंग देण्यात आली आहे. वेबकॅम आणि स्टिरिओ स्पीकरच्या मदतीने तुम्ही JioBook 11 वर व्हिडीओ कॉलिंग देखील करू शकता.
मुकेश अंबानी यांनी नवीनतम iPhone 16 वर एक उत्तम ऑफर आणली आहे. दिवाळीच्या आधी, रिलायन्स डिजिटलवर डिस्काऊंटसह iPhone 16 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फक्त 12,483 रुपयांमध्ये तुम्ही iPhone 16 घरी घेऊन येऊ शकता. 128GB व्हेरिएंट 79,900 रुपयांच्या किंमतीला लाँच करण्यात आला आहे. रिलायन्स स्टोअरवर या फोनवर 5,000 रुपयांचे बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. या सवलतीनंतर त्याची किंमत 74,900 रुपयांपर्यंत खाली येईल.