Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MWC 2025: ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्समध्ये हा ठरला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन! नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये Google Pixel च्या स्मार्टफोनने सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. तसेच ब्रेकथ्रू इनोव्हेशन पुरस्कार हा डिव्हाइसच्या मुख्य हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2025 | 08:52 AM
MWC 2025: ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्समध्ये हा ठरला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन! नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

MWC 2025: ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्समध्ये हा ठरला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन! नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Follow Us
Close
Follow Us:

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 मध्ये टेक आणि स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे नवीन गॅजेट्स आणि अनोख्या संकल्पना सादर केल्या. या इव्हेंटमध्ये आपल्याला भविष्यातील टेक्नॉलॉजीची एक झलक पाहायला मिळाली. 3 मार्चपासून सुरू झालेला हा इव्हेंट 6 मार्च रोजी संपन्न झाला. इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी MWC ने त्याचं यंदाचे वार्षिक विजेते जाहीर केले. यावेळी एकूण 7 श्रेणींमध्ये 33 पुरस्कार देण्यात आले. यातील काही पुरस्काराबद्दल आता आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Pubg mobile 3.7: अखेर प्रतिक्षा संपली! गोल्डन डायनेस्टी मोडसह दुप्पट होणार गेमची मजा, अशा प्रकारे डाऊनलोड करा अपडेट

  • बेस्ट स्मार्टफोन: Google Pixel 9 Pro
  • ब्रेकथ्रू डिवाइस इनोवेशन: Google Gemini
  • बेस्ट कनेक्टेड कंज्यूमर डिवाइस: Tecno Mega Mini Gaming G1
  • बेस्ट इन शो: Xiaomi 15 Ultra

या इव्हेंटमध्ये Pixel 9 Pro ला त्याच्या ‘सर्वोत्कृष्ट परफॉर्मेंस, इनोवेशन आणि लीडरशिप’ या सर्वांसाठी बेस्ट स्मार्टफोन हा अवॉर्ड देण्यात असाल. Pixel 9 Pro ने बेस्ट स्मार्टफोनचा बहुमान मिळवत iPhone 16 Pro, Galaxy S24 Ultra, Magic V3, आणि vivo X200 Pro सारख्या डिव्हाईसना मागे सोडलं. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये Google Pixel ने सलग दुसऱ्यांदा हा विजय मिळवला आहे. ज्यामुळे आता Google Pixel हा iPhone आणि Samsung Galaxy च्या कॅटेगरी मध्ये आला आहे. सहसा MWC पुरस्कारांमध्ये iPhone आणि Samsung galaxy वर्चस्व गाजवतात. पण गेल्या 2 वर्षापासून हा बहुमान Google Pixel पटकावत आहे.

  • 2025: Google Pixel 9 Pro
  • 2024: Google Pixel 8 Series
  • 2023: Apple iPhone 14 Pro
  • 2022: Apple iPhone 13 Pro Max
  • 2021: Samsung Galaxy S21 Ultra
  • 2020: OnePlus 7T Pro

2016 मध्ये जेव्हा गुगलने पहिला Google Pixel लाँच केला तेव्हा त्याचे ध्येय एक महत्त्वाकांक्षी होते. 2021 मध्ये Google Pixel 6 च्या रीडिझाइनसह पिक्सेलला त्याची खरी ओळख मिळाली. त्याला कदाचित ग्लोमो पुरस्कार मिळाले नसतील, परंतु त्याच्या अद्वितीय डिझाइनमुळे ते एक लोकप्रिय डिव्हाईस बनले आणि बघता बघता Google Pixel ने लोकांच्या मनावर राज्य केलं.

MWC 2025: ब्रेकथ्रू इनोव्हेशन पुरस्कार

ब्रेकथ्रू इनोव्हेशन पुरस्कार हा डिव्हाइसच्या मुख्य हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी आहे. ही कॅटेगरी प्रोसेसर, कॅमेरे, स्क्रीन आणि इतर तंत्रज्ञानासाठी आहेत आणि Gemini ने एंड कंज्यूमरसाठी डिझाइन केलेल्या जनरेटिव्ह AI ने ज्युरींचे मन जिंकले. इतर नॉमिनेटेड टेकमध्ये Galaxy AI, Snapdragon 8 Elite चिपसेट, आणि Huawei Mate XT चा ट्राई-फोल्ड हिन्ज यांचा समावेश होता.

MWC 2025: बेस्ट कनेक्टेड कंझ्युमर डिव्हाइस

बेस्ट कनेक्टेड कंझ्युमर डिव्हाइस कॅटेगरी ही सर्वात डाइवर्स आणि मोबाइल प्रोडक्ट्स, गैजेट्स, सर्विसेज, सॉल्यूशन्स आणि एप्लिकेशन्ससाठी खुली आहे.विजेता Mega Mini Gaming G1 हा जगातील सर्वात छोटा वाटर-कूल्ड गेमिंग मिनी PC आहे, जो Intel Core i9-13900H प्रोसेसर आणि GeForce RTX 4060 GPU सह येतो. याची किंमत $1,699 आहे आणि ते गेल्या काही महिन्यांपासून बाजारात उपलब्ध आहे.

WhatsApp Update: आनंदाची बातमी! मेसेजिंग अ‍ॅपमध्ये होणार मोठा बदल, Meta AI ला मिळणार नवीन लूक

MWC 2025: बेस्ट इन शो

‘बेस्ट इन शो’ श्रेणी ही मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये घोषित केलेल्या प्रॉडक्ट्ससाठी आणि डिव्हाईससाठी आहे. बेस्ट इन शोचा बहुमान Xiaomi 15 Ultra ने पटकावला आहे.

Web Title: Mwc 2025 google pixel 9 pro wins the best smartphone award in mobile world congress tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • google pixel
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
2

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
3

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
4

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.