Pubg mobile 3.7: अखेर प्रतिक्षा संपली! गोल्डन डायनेस्टी मोडसह दुप्पट होणार गेमची मजा, अशा प्रकारे डाऊनलोड करा अपडेट
PUBG Mobile चे बहुप्रतिक्षित 3.7 अपडेट 7 मार्च 2025 म्हणजेच आजपासून रिलीज झाले आहे. या अपडेटमध्ये एक नवीन Golden Dynasty मोड जोडला गेला आहे, ज्यामध्ये खेळाडूंना जादुई जग, तरंगते बेटे आणि एक विशेष टाइम-बेंडिंग डॅगर अनुभवता येईल. याशिवाय, नवीन 8×8 किमी Rondo नकाशा पूर्वेकडील संस्कृतीपासून प्रेरित आहे, ज्यामध्ये डायनामिक वेदर फीचर असेल. हे अपडेट Google Play Store, Apple App Store, Samsung Galaxy Store आणि Huawei App Gallery वर उपलब्ध आहे.
खरं तर गेमर्स बऱ्याच काळापासून PUBG मोबाईलच्या 3.7 अपडेटची वाट पाहत होते. गेमर्सची प्रतीक्षा आता संपली आहे. क्राफ्टनने अखेर PUBG मोबाईल 3.7 अपडेट रिलीज केलं आहे. हे अपडेट 2025 मधील दुसरे मोठे अपडेट आहे. या अपडेटमध्ये गोल्डन डायनेस्टी मोड, रोंडो मॅप, WOW मोडमधील बदल इत्यादी काही प्रमुख अपग्रेड्स आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्स त्यांच्या फोनच्या स्टोअरमधून PUBG मोबाईलचे नवीन अपडेट डाउनलोड करू शकतात. याशिवाय, ते गेमच्या वेबसाइटवरून 3.7 अपडेट APK देखील डाउनलोड करू शकतात. PUBG मोबाईल 3.7 अपडेटमध्ये एक नवीन गोल्डन डायनेस्टी मोड येत आहे, जो जुन्या आइसमायर फ्रंटियर मोडची जागा घेईल. या अपडेटमध्ये अनेक नवीन आयटम आणि वैशिष्ट्ये देखील येतील.
PUBG मोबाईल 3.7 अपडेट आज सकाळी, 7 मार्च 2025 रोजी सुरू झाले आहे. मागील अपडेट्सप्रमाणेच, अँड्रॉइड युजर्सना प्रथम अपडेट मिळेल आणि काही तासांनंतर, iOS युजर्स ते डाउनलोड करू शकतील.
MWC 2025: आतापर्यंत ईव्हेंटमध्ये काय घडलं? कोणते गॅझेट्स झाले लाँच? जाणून सर्व काही एका क्लिकवर
PUBG मोबाईलच्या नवीन अपडेटमध्ये एक नवीन रोंडो नकाशा उपलब्ध असेल, जो 8×8 किलोमीटरचा असेल. या नकाशात एका वेळी सुमारे 100 खेळाडू खेळू शकतात. रोंडो नकाशावर जडेना सिटी, जाओ टिन, रिन जियांग सारखी काही आश्चर्यकारक ठिकाणे असतील. जडेना शहर हे एक मोठे आणि गजबजलेले शहर असेल, उंच इमारती, सुंदर रात्रीचे दृश्ये, पूल आणि चमकणारे निऑन चिन्हे यांनी भरलेले असेल. या नकाशात यू लिन देखील असेल, ज्यामध्ये हिरवीगार झाडे आणि इमारती असतील. तिथे एक कार फॅक्टरी NEOX देखील असेल, जिथे लोक नवीन कार पाहू शकतील.