Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॉकेटमध्ये चार्जर लावूनच ठेवताय? होऊ शकतं फार मोठ नुकसान, तुम्ही विचारही केला नसेल…. लवकर सुधारा तुमची सवय

स्मार्टफोनसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्मार्टफोनचा चार्जर. स्मार्टफोनचा चार्जर खराब होण्याची अनेक कारणं असू शकतात, यातीलच एक कारण म्हणजे चार्जर सॉकेटमध्ये लावून ठेवणं. यामुळे नुकसान होऊ शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2025 | 10:50 AM
सॉकेटमध्ये चार्जर लावूनच ठेवताय? होऊ शकतं फार मोठ नुकसान, तुम्ही विचारही केला नसेल.... लवकर सुधारा तुमची सवय

सॉकेटमध्ये चार्जर लावूनच ठेवताय? होऊ शकतं फार मोठ नुकसान, तुम्ही विचारही केला नसेल.... लवकर सुधारा तुमची सवय

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळात जगातील प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतो. स्मार्टफोनचा वापर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते चार्जर. असे अनेक लोकं आहेत जे स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी सॉकेटमध्ये चार्जर लावतात, पण नंतर तो चार्जर सॉकेटमधून काढायचा विसरून जातात. त्यामुळे संपूर्ण दिवस चार्जर सॉकेटमध्येच असतो. असे देखील काही लोकं आहेत जे सॉकेटचे बटण देखील बंद करत नाहीत. काही लोकं आळसामुळे असं करतात तर घाई असल्यामुळे काहींच्या लक्षात राहत नाही. तुम्ही देखील असंच करता का?

Government Warning! करोडो Android स्मार्टफोन्ससाठी सरकारने जारी केला अलर्ट, हॅकर्स करू शकतात अटॅक; लगचेच फोन करा अपडेट

होऊ शकतं मोठं नुकसान

चार्जर संपूर्ण दिवस सॉकेटमध्ये राहिला, तसेच बटण चालू असो किंवा बंद काय फरक पडतो, असाच विचार तुम्ही देखील करता का? तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. चार्जर सॉकेटमध्ये प्लग केल्याने आणि बटण चालू ठेवल्याने अनेक नुकसान होऊ शकतात. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या चार्जरचे फार मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमची ही सवय वेळीच बदलण अत्यंत आवश्यक आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

सॉकेटचं बटण बंद करणं गरजेचं का?

तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की, जर तुम्ही सॉकेटमध्ये चार्जर लावूनच ठेवला आणि बटण चालू असेल तर विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तुम्ही डिव्हाईस चार्जिंगला लावले आहे की नाही यामुळे काहीही फरक पडत नाही. जर तुमचा चार्जर सॉकेटमध्ये असेल आणि बटण चालू असेल तर विजेचा वापर केला जातो. हा विजेचा अपव्यय आहे. यालाच वँपायर पावर किंवा फँटम लोड असं देखील म्हटलं जाते. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की विजेचा अपव्यय, विजेचे बिल वाढणे आणि विजेचा झटका लागणं.

करंट लागण्याच धोका

अनेक चार्जर जास्त वोल्टचे असतात, असे चार्जर सॉकेटमध्ये लावून ठेवले आणि बटण चालू राहिले तर करंट लागण्याच धोका देखील असतो. याशिवाय चार्जर किंवा दुसरे डिव्हाईस सतत प्लग इन असल्याने ओव्हरहिट होऊ शकतात, यामुळे ब्लास्ट होण्याची देखील शक्यता असते. यामुळे केवळ चार्जरच नाही तर सॉकेटचं देखील नुकसान होऊ शकतं. या घटना टाळण्यासाठी चार्जरचा वापर करताना योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून, सॉकेटमध्ये चार्जर चालू ठेवण्याची तुमची सवय वेळीच बदला, अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. असे केल्याने तुम्ही वर्षभर भरपूर वीज वाचवू शकता. यामुळे तुमचा खर्च कमी होईल आणि तुमच्या खिशात जास्त पैसे वाचतील.

Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम

या प्रकारे घ्या चार्जरची काळजी

तुमचा चार्जर दिर्घकाळ चालावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बरेच लोक बेडवर किंवा सोफ्यावर बसून केबल ओढून चार्जर काढण्याचा प्रयत्न करतात, पण असं करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जोरात ओढल्यामुळे चार्जरची केबल तुटू शकते. म्हणून, नेहमी सॉकेटमधून अ‍ॅडॉप्टर हलक्या हाताने धरून काढा. चार्जर कधीही ओल्या किंवा पाण्याने भरलेल्या पृष्ठभागावर ठेवू नका, यामुळे चार्जर लवकर खराब होण्याची शक्यता असते. जर चार्जर ओला झाला तर वापरण्यापूर्वी तो पूर्णपणे वाळवा.

Web Title: Never leave smartphone charger plugged in socket it may dangerous tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड
1

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…
2

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित
3

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव, TRAI आणि DoT ने घेतला मोठा निर्णय
4

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव, TRAI आणि DoT ने घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.