Tesla ची अनोखी ऑफर! Elon Musk ला मिळणार तब्बल 1000,000,000,000 रुपये पगार, फक्त करावं लागणार कंपनीचे हे काम
अमेरिकेतील दिग्गज कंपनी टेस्लाने त्यांच्या चीफ एग्क्यूटिव ऑफिसर (CEO) एलन मस्कला एक अनोखी ऑफर दिली आहे. ही ऑफर तब्बल 1 ट्रिलियल डॉलर पगाराची आहे. पण यासाठी मस्कला कंपनीने दिलेले काही टार्गेट पूर्ण करावे लागणार आहेत. खरं तर कंपनी एक नवीन बेंचमार्क स्थापित करण्याचा विचार करत आहे, यासाठी कंपनीला मस्कच्या नेतृत्वाची गरज आहे. याच नेतृत्वासाठी कंपनी आता एलन मस्कला तब्बल 1 ट्रिलियल डॉलर पगार देण्याचा विचार करत आहे. कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केल्यानंतर मस्कला तब्बल 1 ट्रिलियल डॉलरचे पॅकेज दिले जाणार आहे. असं झालं मस्क जगातील पहिला ट्रिलेनियर बनणार आहे.
Bloomberg Billionaires Index मध्ये दिलेल्या माहितीनुसार, एलन मस्ककडे सध्या 386 बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 38.6 हजार करोड रुपयांची संपत्ती आहे. जर टेस्लाची वाढ अशीच सुरु राहिली आणि मस्कला नवीन स्टॉक पॅकेज मिळाले. यानंतर तो इतिहासातील पहिला ट्रिलियनेअर बनेल. यानंतर त्याची संपत्ती 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
एलन मस्ककडे सध्या जगातील पहिला ट्रिलेनियर बनण्याची संधी आहे. मात्र यासाठी त्याला मोठं टार्गेट पूर्ण करावं लागणार आहे.
जर मस्कने टेस्लाला वेगाने पुढे नेलं तर कंपनीची मार्केट व्हॅल्यू 8.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. यामुळे तो कंपनीच्या विद्यमान शेअर्सपैकी 12% मिळवू शकतो. सध्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू सुमारे 1 ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजेच हे स्थान मिळवण्यासाठी, मस्कला कंपनीचे मूल्य 8 पटीने वाढवावे लागेल.
मस्कला यावर्षी त्याच्या कामासाठी जे पॅकेज मिळणार आहे, त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 87.75 बिलियन डॉलर असणार आहे. जेव्हा मस्क त्याचे सर्व टार्गेट पूर्ण करेल तेव्हा त्याला कंपनीतील काही खास शेअर्स दिले जाऊ शकतात. ज्यामुळे मस्कचे पॅकेज 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढू शकते. म्हणजेच ही किंंमत सुमारे 1000 बिलियन डॉलर असू शकते. केवळ कंपनीची मार्केट व्हॅल्यू वाढवून चालणार नाही तर मस्कला टेस्लाने दिलेले काही टार्गेट देखील पूर्ण करावे लागणार आहेत. जसे की त्यांना 2 कोटी टेस्ला वाहने वितरित करावी लागतील आणि 10 लाख रोबोटॅक्सी बाजारात आणाव्या लागतील आणि त्यांचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू करावे लागेल.
या महिन्याच्या सुरुवातीला टेस्लाने त्यांच्या सिईओ एलन मस्कला सुमारे 29 बिलियन डॉलर म्हणजेच 2900 करोड रुपयांचे एक खास गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात स्पर्धा सतत वाढत असताना, कंपनीने आपल्या सर्वोत्तम प्रतिभेला टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. यामुळेच आता लवकरच मस्क जगातील पहिला ट्रिलेनियर बनू शकतो.