Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Debit Card From ATM: डेबिट कार्ड मिळवण्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करणे आणि कार्ड येण्याची वाट पाहण्याची प्रक्रिया लवकरच सोपी होण्याची शक्यता आहे. सरकारकडून ATM मशीनमधून थेट नवीन डेबिट कार्ड मिळवून देणारी सुविधा सुरू करण्याची तयारी असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 10, 2026 | 03:20 PM
आता ATM मधूनच मिळणार Debit Card (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

आता ATM मधूनच मिळणार Debit Card (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता ATMमधूनच थेट Debit Card मिळवण्याची सुविधा येणार.
  • मुंबईतील Global Fintech Fest 2026 मध्ये सुविधेच्या लॉन्चचा दावा.
  • ग्राहकांचा वेळ वाचणार आणि बँक शाखांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
पूर्वी बँकेत खातं उघडलं की ATM कार्डसाठी 8 दिवस वाट बघावी लागायची. कार्ड पोस्टाने घरी यायचं. आता काही बँका एका दिवसात देतात पण तरी पण ब्रँचमध्ये जा, फॉर्म भरा, ही कटकट आहेच. पण आता सरकार एक अशी सुविधा आणतंय की तुम्हाला डेबिट कार्ड थेट ATM मशीनमधूनच मिळेल.

ही काय भानगड आहे?

मुंबईत होणार लॉन्चमुंबईत 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान Global Fintech Fest 2026 भरते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबरच्या संध्याकाळी DFS सेक्रेटरी ही नवीन सुविधा लॉन्च करणार आहेत. यामुळे डेबिट कार्ड देण्याची जुनी पद्धत पूर्णपणे बदलून जाणार आहे. नवीन कार्ड हवं असेल तर बँकेत जा, अर्ज करा, मग ते कार्ड प्रिंट होऊन हेड ऑफिसमधून तुमच्या घरी यायचं. 7 ते 10 दिवस जायचे. मध्ये हरवलं तर परत तेच. या नवीन सिस्टममुळे हे सगळं बंद होणार आहे. Debit Card From ATM:

याचा फायदा काय?

सरकारचा उद्देश एकच आहे, काम सोपं आणि फास्ट करणं. सध्या बँकेच्या शाखेत खूप गर्दी असल्याने साध्या कार्डसाठी पण लोकांना रांगेत उभं राहावं लागतं. कर्मचाऱ्यांवर पण लोड येतो. ही ATM वाली सुविधा आली की लोकांचा वेळ वाचेल आणि बँकेचं काम पण हलकं होईल. खास करून ग्रामीण भागात जिथे बँक लांब असते, तिथल्या लोकांना याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. जवळच्या ATM मध्ये गेलं की काम झालं.

ब्रँचला जाण्याची गरजच नाही

ही व्यवस्था सुरू झाली की तुम्हाला बँकेत जाण्याची गरजच पडणार नाही. तुम्ही थेट ATM वरून कार्ड घेऊ शकता. विचार करा, सकाळी तुमचं कार्ड हरवलं, दुपारी तुम्ही जवळच्या ATM मध्ये जाऊन नवीन कार्ड काढून घेऊ शकता. किती सोपं झालं.

AirPods 5: AirPods चाहत्यांसाठी गुड न्यूज! नवीन AirPods 5 अधिक चांगले अन् स्वस्तही

नवी सिस्टम काम कशी करणार?

  • ही पद्धत एकदम सोपी असणार आहे. समजा तुमचं डेबिट कार्ड हरवलं, तुटलं किंवा एक्सपायर झालं.
  • तुम्हाला फक्त जवळच्या ATM मध्ये जायचं आहे.
  • तिथे स्क्रीनवर ‘Instant Debit Card’ किंवा ‘Get New Card’ असा पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लिक करायचं.
  • मग तुमचा आधार नंबर किंवा खाते नंबर आणि मोबाईलवर आलेला OTP टाकायचा.
  • तुमची ओळख पटली की मशीनमध्येच तुमचं नवीन डेबिट कार्ड प्रिंट होऊन बाहेर येईल.
  • अगदी ATM मधून पैसे निघतात तसंच.काही बँका यात बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्याचा ठसा पण घेणार आहेत.
  • जेणेकरून दुसऱ्या कोणी तुमचं कार्ड काढू नये. पूर्ण सुरक्षित.
Appleचा यूजर्सना मोठा दिलासा! मोफत Satellite Accessची मुदत पुन्हा वाढवली

बँकिंग होणार आणखी आधुनिक

या एका पावलाने बँकिंग सेवा खूपच आधुनिक होणार आहे. ग्राहकांना तर फायदा आहेच, पण बँकेच्या शाखांवरचा ताण पण कमी होणार आहे. छोट्या-छोट्या कामांसाठी लोक बँकेत जाणार नाहीत.आता बघूया, ही सुविधा सुरू झाल्यावर कोणत्या बँका सगळ्यात आधी ATM मध्ये ही मशीन बसवतात. पण एक नक्की, पुढच्या काही महिन्यात पोस्टमनची वाट बघण्याचे दिवस संपणार आहेत.

Web Title: New facility to let customers get debit cards directly from atms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • ATM
  • debit card
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
2

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
3

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
4

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.