Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी… अन्यथा होईल पश्चाताप

Smartwatch Buying Guide: आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्समुळे सध्या अनेक लोकं स्मार्टवॉच खरेदी करण्यावर अधिक फोकस करतात. कारण स्मार्टवॉचच्या मदतीने कॉलिंग आणि मेसेजिंगसारखी काम फोनचा वापर न करता केली जाऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2026 | 01:44 PM
Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी... अन्यथा होईल पश्चाताप

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी... अन्यथा होईल पश्चाताप

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टवॉच खरेदी करताना डिझाईनसोबत बॅटरी लाइफ, डिस्प्ले गुणवत्ता आणि बिल्ड क्वालिटीकडेही लक्ष द्या.
  • हेल्थ ट्रॅकिंग, GPS, ब्लूटूथ कॉलिंग आणि अ‍ॅप सपोर्ट यांसारखी फीचर्स तुमच्या गरजेनुसार तपासणे महत्त्वाचे आहे.
  • फोनशी सुसंगतता, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि ब्रँडचा विश्वासार्हपणा पाहूनच अंतिम निर्णय घ्यावा.
Smartwatch Buying Tips: स्मार्टवॉचचा आकार जितका छोटा आहे, त्याचे फायदे तितकेच जास्त आहे. एक छोटं मनगटावरील गॅझेट आपल्याला कॉलिंगपासून हेल्थ फीचर्सपर्यंत अनेक वेगवेगळे फीचर्स ऑफर करतो. स्मार्टवॉच स्टेप ट्रॅकिंगपासून हार्ट रेटपर्यंत आपल्याला अनेक वेगवेगळे हेल्थ फीचर्स ऑफर करतो.

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी

स्मार्टवॉचचा आकार छोटा असला तरी फायदे मोठे आहेत. त्यामुळे अनेक लोकं हल्ली स्मार्टवॉचचा वापर करताना पाहायला मिळतात. अनेकांना असं वाटतं की सर्व कंपन्या त्यांच्या स्मार्टवॉचमध्ये एकसारखे फीचर्स ऑफर करतात. त्यामुळे अनेकजण स्मार्टवॉचचे फीचर्स न पाहता केवळ डिझाईन पाहून डिव्हाईस खरेदी करतात. तुम्ही देखील असाच विचार करून स्मार्टवॉच खरेदी करत असाल तर नक्कीच तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. स्मार्टवॉच खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

सुसंगतता

स्मार्टवॉच हे स्मार्टफोनचा एक भाग म्हणून डिझाईन करण्यात आले आहे. स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनमधील अनेक महत्त्वाचे फीचर्स केवळ मनगटावरून मॅनेज करू शकता. यामुळे स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच यांच्यामध्ये सुसंगतता असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणतेही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्यापूर्वी ते तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉईड स्मार्टफोनसोबत योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही हे तपासा.

बजेट

स्मार्टफोन आणि दुसऱ्या गॅझेट्सप्रमाणेच स्मार्टवॉच देखील वेगवेगळे फीचर्स, डिझाईन आणि प्राईज सेगमेंटमध्ये उपलब्ध असतात. जर तुम्ही अ‍ॅपल किंवा सॅमसंग सारख्या कंपन्यांचे स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे खर्च करावे लागू शकतात. कारण या कंपन्यांचे स्मार्टवॉच सहसा प्रिमियम सेगमेंटमध्ये उपलब्ध असतात. पण जर तुमचे बजेट थोडे कमी असेल तर तुम्ही इतर कंपन्यांच्या स्मार्टवॉचचा विचार करू शकता. स्मार्टवॉच खरेदी करण्यापूर्वी, उपलब्ध पर्यायांवर एक नजर टाका आणि तुमच्या बजेटनुसार आवश्यक फीचर्सवर लक्ष केंद्रित करा आणि खरेदीचा योग्य निर्णय घ्या.

कंफर्ट

स्मार्टवॉच खरेदी करण्याचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा तुम्ही यामधील सर्व फीचर्सचा वापर करता. मात्र यासाठी तुम्हाला स्मार्टवॉच दिर्घकाळ तुमच्या मनगटावर घालावे लागते. यासाठी सर्वात महत्त्वाती गोष्ट म्हणजेच कंफर्ट. जर तुम्ही डिझाईन आणि रंग पाहून असे एखादे स्मार्टवॉच खरेदी केले, ज्यामुळे तुमच्या हाताला त्रास होत असेल, मनगट दुखत असेल, तर याचा काहीच फायदा नाही. बऱ्याच लोकांना सिलिकॉन बँड आवडत नाहीत, तर काहींना मेश बँडच्या टिकाऊपणाबद्दल चिंता वाटते. त्यामुळे, आरामदायीपणाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

फीचर्स

स्मार्टवॉचमध्ये अनेक खास फीचर्स ऑफर केले जातात. मात्र सर्वच यूजर्सना प्रत्येक फीचरची गरज असेलच असं नाही. सहसा कंपन्या काही फीचर्स केवळ मार्केटिंगसाठी वापरतात. मात्र सामान्य यूजर्सना त्याचा खरंच फायदा होईलच असं नाही. त्यामुळे तुम्ही खरेदी,करत असलेल्या स्मार्टवॉचमध्ये कोणते फीचर्स आहेत, तपासा. काही लोकं उत्साहात फीचर-लोडेड स्मार्टवॉच खरेदीस करतात. मात्र नंतर या फीचर्सचा काहीच उपयोग होत नाही. स्मार्टवॉचमध्ये जितके जास्त फीचर्स असतील तुम्हाला नोटिफिकेशन आणि अलर्टचा वारंवार सामना करावा लागू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टवॉच म्हणजे काय?

    Ans: स्मार्टवॉच हे मनगटावर घालायचे स्मार्ट उपकरण आहे, जे वेळ दाखवण्याबरोबरच फिटनेस, आरोग्य आणि नोटिफिकेशनसारखी फीचर्स देते.

  • Que: स्मार्टवॉच मोबाईलशिवाय वापरता येते का?

    Ans: काही फीचर्स वापरता येतात, पण पूर्ण सुविधांसाठी स्मार्टवॉच फोनशी कनेक्ट करणे आवश्यक असते.

  • Que: स्मार्टवॉचमध्ये कॉलिंग करता येते का?

    Ans: होय, अनेक स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग किंवा eSIM कॉलिंगची सुविधा उपलब्ध असते.

Web Title: Not only design but also focus on these important things while buying new smartwatch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • smartwatch
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी
1

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?
2

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?
3

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी
4

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.