Jio Recharge Plan: 'हा' आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे... किंमत 500 रुपयांहून कमी
स्नॅपचॅट हे तरूणांमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आता टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन मोफत ऑफर करते. कदाचित जिओ अशी पहिली टेलिकॉम कंपनी असावी जी प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये त्यांच्या यूजर्सना स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन देत आहे. कंपनी स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन ऑफर करत असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे आणि या प्लॅनमध्ये इतर कोणते फायदे ऑफर केले जातात, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 459 रुपये ठेवण्यात आली आहे. तरूणांच्या गरजा लक्षात घेत कंपनीने हा रिचार्ज प्लॅन डिझाईन केला आहे. जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि 2GB डेली डेटा ऑफर केला जाणार आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना जिओ 5GB चा फ्री बोनस डेटा देखील देत आहे, जो यूजरची त्या दिवशीची डेली डेटा लिमिट संपल्यानंतर अॅक्टिव्हेट होणार आहे. या प्लॅनसोबत काही इतर फायदे देखील जोडण्यात आले आहेत. ज्यामध्ये 3 महिन्यांसाठी जिओहॉटस्टार मोबाईल अॅक्सेस समाविष्ट आहे. यासोबतच, जिओक्लाऊडद्वारे 50GB चे फ्री क्लाउड स्टोरेज मिळणार आहे.
इतकंच नाही, या प्लॅनमध्ये 35,100 रुपयांच्या किंमतीचे 18 महीन्यांचे गुगल एआय प्रो सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे, जो 5000GB क्लाउड स्टोरेज, नॅनो बनाना आणि इतर फीचर्ससह येतो. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होणार आहे. पात्र यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे. यूजर्स मायजिओ अॅपद्वारे स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन क्लेम करू शकणार आहेत. याशिवाय, जिओटिव्हीच्या मदतीने फॅनकोडचा अॅक्सेस देखील मिळणार आहे. प्लॅनची व्हॅलिडीटी संपल्यानंतर गूगल एआय प्रो सबस्क्रिप्शन सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांना 349 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या प्रीपेड प्लॅनने रिचार्ज करणे सुरू ठेवावे लागेल. या प्लॅनमध्ये जिओगेम्स मोबाईलचाही समावेश आहे.
Ans: जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची कंपनी असून तिच्या विस्तारात मुकेश अंबानी यांची महत्त्वाची भूमिका आहे.
Ans: होय, Jio ने भारतातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे.
Ans: होय, Jio कडे प्रीपेड, पोस्टपेड, डेटा आणि OTT बेनिफिट्ससह विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत.






