Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

Nothing OS 5.0 Update: नथिंग 25 ऑगस्ट रोजी नथिंग ओएस 5.0 बीटा प्रोग्रामची घोषणा करण्याची शक्यता आहे. पहिले पब्लिक बीटा वर्जन यावर्षीच्या अखेरपर्यंत रोलआऊट केले जाऊ शकते. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2026 | 11:36 AM
Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका... जाणून घ्या सविस्तर

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका... जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • Nothing ओएस 5.0 ची 25 ऑगस्ट रोजी घोषणा होणार असून, त्याचा बीटा प्रोग्रामही याच दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • नव्या ओएसमध्ये अँड्रॉईड 17 आधारित ‘बबल्स’ आणि ‘स्क्रीन रिअ‍ॅक्शन्स’ सारखी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
  • नथिंग 4a सीरीज आणि फोन 3 ला हे अपडेट सुरुवातीला मिळण्याची शक्यता असून, स्टेबल व्हर्जनची तारीख अद्याप स्पष्ट नाही.
लंदन बेस्ड टेक कंपनी नथिंग पुढील आठवड्यात त्यांचा नेक्स्ट-जेनरेशन फर्मवेयर वर्जन नथिंग ओएस 5.0 सादर करणार आहे. हे नवीन ओएस वर्जन अँड्रॉईड 17 वर आधारित असणार आहे, जे यावर्षींच्या सुरुवातीला सादर करण्यात आले होते. सध्या अँड्रॉईड 17 चे स्टेबल वर्जन केवळ निवडक गूगल पिक्सेल डिव्हाईस (पिक्सेल 6 आणि त्यापेक्षा मॉडेल्स) वरच उपलब्ध आहे. मोटोरोला, ओप्पो आणि विवो सारख्या अनेक टेक ब्रँड्सने त्यांच्या बीटा प्रोग्राम्सची घोषणा केली आहे. नथिंग देखील 25 ऑगस्ट रोजी नथिंग ओएस 5.0 बीटा प्रोग्रामची घोषणा करण्याची शक्यता आहे.

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

25 ऑगस्टला लाँच होणार नथिंग ओएस 5.0

गुरुवारी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये, कार्ल पेई यांच्या नेतृत्वाखालील स्मार्टफोन निर्माता कंपनीने घोषणा केली आहे, नथिंग ओएस 0.5 हे 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता BST (दुपारी 3:30 वाजता IST) सादर केले जाणार आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओच्या टिझरमध्ये आगामी अपडेट्सबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही, मात्र या टिझरमध्ये डिझाईन बदलाबाबत काही संकेत नक्कीच मिळत आहेत. यामध्ये नवीन आयकॉन आणि विजेट समाविष्ट आहे. नथिंग ओएस 5.0 लेटेस्ट अँड्रॉईड 17 अपडेटवर आधारित असणार आहे. याचा अर्थ असा आहे की, ओएस अपग्रेडचा भाग म्हणून यामध्ये नवीन फीचर्स मिळू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

More joy, every day.
Nothing OS 5.0 25.08.
11:00 BST pic.twitter.com/OThGjRCSH6
— Nothing (@nothing) August 20, 2026

कंपनी 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या नथिंग ओएस 5.0 बीटा प्रोग्रामची घोषणा करण्याची शक्यता आहे. याचे पहिले पब्लिक बीटा वर्जन यावर्षीच्या अखेरपर्यंत रोलआऊट केले जाऊ शकते. स्टेबल वर्जन कधीपर्यंत रिलीज केले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या नथिंग 4 ए सीरीज आणि फ्लॅगशिप फोन 3 साठी हे अपडेट सर्वात आधी रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेटमध्ये काय असणार खास?

गूगलने जून महिन्यात पिक्सेल 6 आणि त्यानंतरच्या स्मार्टफोनसोबत पिक्सेल टॅब्लेटसाठी अँड्रॉईड 17 अपडेटचे पहिले स्टेबल वर्जन रोल आउट करण्यास सुरुवात केली. केवळ ज्या पिक्सेल फोन्सना अँड्रॉईड 17 अपडेट मिळाले आहे, तेच याशी सुसंगत आहेत. आधीच सांगितल्याप्रमाणे, मोटोरोलाने त्यांच्या अँड्रॉईड 17 बीटा प्रोग्रामची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्याचप्रमाणे, विवोने अँड्रॉईड 17 वर आधारित ‘ओरिजिनओएस 7’ बीटा प्रोग्रामची घोषणा केली आहे आणि ओप्पोने अँड्रॉइड 17 वर आधारित ‘कलरओएस 17’ बीटा प्रोग्राम सादर केला आहे.

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत

फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, अँड्रॉईड 17 मध्ये नवीन मल्टीटास्किंग फीचर ‘बबल्स’ जोडले आहेत, ज्याच्या मदतीने, एखाद्या ॲपच्या आयकॉनवर दीर्घकाळ दाबून (लाँग-प्रेस करून) ते ॲप ‘फ्लोटिंग विंडो’मध्ये रूपांतरित करता येते. याव्यतिरिक्त, ‘स्क्रीन रिअ‍ॅक्शन्स’ हे एक नवीन वैशिष्ट्य सादर करण्यात आले आहे, जे स्क्रीन रेकॉर्डिंगसोबतच फ्रंट कॅमेऱ्याद्वारे यूजरची प्रतिक्रिया देखील रेकॉर्ड करते. स्क्रीन रेकॉर्डिंगवर एका लहान चौकटीत कॅमेराचा व्हिडिओ दिसतो. ‘नथिंग ओएस 5.0’ मध्येही या वैशिष्ट्यांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Nothing os 5 0 launch on august 25 android 17 based update to bring new features and design changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • nothing
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
1

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स
2

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
3

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
4

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.