चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स
राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
पोको स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आहे. कंपनी या फोनवर 2 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंटसह 27 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्ल्यू आणि लेदर ग्रीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Flipkart)
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच HD+ (720 x 1600 पिक्सेल) एलसीडी टचस्क्रीन देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा स्मार्टफोन कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच हे डिव्हाईस डिस्प्ले वेट टच 2.0 सपोर्टसह येतो. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे.
Poco M8x 5G स्मार्टफोन 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. पोको फोन अँड्रॉईड 16 सह शाओमीच्या कस्टम यूजर इंटरफेस हायपरओएस 3 वर चालतो. या स्मार्टफोनला 4 वर्षांपर्यंत ओएस अपडेट आणि 6 वर्षांपर्यंत सुरक्षा पॅच अपडेट दिले जाणार आहे.
नव्या पोको स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे, जो 2x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेकेंडरी कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा लेंस दिला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Poco M8x 5G स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,900mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच, फोनमध्ये 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जमध्ये 35 तासांची सोशल मीडिया स्क्रॉलिंग, 27 दिवसांसाठी मेसेजिंग आणि 13 तास जीपीएस नेविगशनचा सपोर्ट दिला आहे. Poco M8x 5G मध्ये ट्रिपल कूलिंग सॉल्यूशन, ज्यामध्ये 12,439 चौ.मिमी ग्रेफाइट कूलिंग एरिया, 1,924 चौ.मिमी कॉपर फॉइल लेयर आणि 3.5W थर्मल जेल देण्यात आला आहे.






