
Nothing Phone 3a Lite: स्वस्तात मस्त आणि अनुभव मिळणार जबरदस्त! नोटिफिकेशन इंडिकेटर आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज असेल नवा स्मार्टफोन
टेक कंपनी Nothing आता आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन त्याच्या इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळा असणार आहे. कारण कंपनी हा नवीन स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीचा हा आगामी बजेट स्मार्टफोन Nothing Phone 3a Lite या नावाने लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील समोर आली आहे. अवघ्या काही तासांत म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी Nothing Phone 3a Lite लाँच केला जाणार आहे. कंपनीचा हा डिव्हाईस फोन 3 लाइनअपचे लेटेस्ट डिव्हाईस असणार आहे.
सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…
मिळालेल्या माहितीनुसार, Nothing Phone 3a Lite स्मार्टफोन 29 ऑक्टोबर रोजी ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाणार आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये रियर पॅनलच्या खालील बाजूला एक एलईडी फ्लॅशलाइट दिसणार आहे, जो एक नोटिफिकेशन इंडिकेटर असू शकतो.
तथापी कंपनीने आगामी हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा केलेला नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये आगामी स्मार्टफोनचे काही फीचर्स दिले आहेत. कंपनीचा हा आगामी बजेट स्मार्टफोन मीडियाटेक 7300 चिपसेटने सुसज्ज असणार आहे. ज्याला माली-G615 MC2 GPU सह लाँच केला जाऊ शकतो. डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 15 आणि 8GB रॅम दिली जाणार आहे, ज्याला अलीकडेच चाचणीजदरम्यान स्पॉट केले होते. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, Nothing Phone 3a Lite हा स्मार्टफोन 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:00 वाजता GMT म्हणजेच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता ग्लोबल मार्केटमध्ये लाँचे राल जाणार आहे. कंपनीने हँडसेटच्या बॅक पॅनलचा टिझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये एक एलईडी लाइट दिसत आहे. हा लाईट एक नोटिफिकेशन इंडिकेटर असू शकतो, परंतु त्याचे स्पेसिफिकेशन्स, वैशिष्ट्ये आणि किंमत अद्याप उघड केलेली नाही.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या या आगामी डिव्हाईसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक 7300 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. या चिपमध्ये 2GHz वर चार एफिशिएंसी कोर आणि 2.50GHz वर चार परफॉर्मेंस कोर असण्याची अपेक्षा आहे. शिवाय, फोनमध्ये Mali-G615 MC2 GPU असण्याची अपेक्षा आहे. तथापि, हे डिव्हाइस फक्त सिंगल व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज याचा समावेश असू शकतो. अहवालांमध्ये असेही सूचित केले आहे की नथिंग फोन 3a लाईटची किंमत नथिंग फोन 3a पेक्षा कमी असू शकते.