Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing Phone (3a): युनिक डिझाइन आणि जबरदस्त कॅमेरा… Nothing स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Nothing Phone (3a) मध्ये 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Nothing Phone (3a) Pro मध्ये देखील 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या दोन्हींची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 05, 2025 | 08:46 AM
Nothing Phone (3a): युनिक डिझाइन आणि जबरदस्त कॅमेरा... Nothing स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Nothing Phone (3a): युनिक डिझाइन आणि जबरदस्त कॅमेरा... Nothing स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Follow Us
Close
Follow Us:

Nothing ने भारतात Phone (3a) सीरीज अधिकृतपणे लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये Nothing Phone (3a) आणि Phone (3a) Pro यांचा समावेश आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन MWC 2025 मध्ये 3 मार्चला सादर केले होते. कंपनीने लाँच केलेली ही नवीन स्मार्टफोन सीरिज पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक अपग्रेड आहे.

Xiaomi 15 ला टक्कर देणार हे 5 तगडे स्मार्टफोन्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून ठरवा तुमच्यासाठी कोणता बेस्ट

या सीरिजमध्ये सर्वात मोठा अपग्रेड Qualcomm Snapdragon चिपसेट्सचा वापर आहे, मागील बाजूस नथिंग चा सिग्नेचर Glyph Interface देखील आहे. कॉम्पिटिटिव प्राइसिंग आणि प्रीमियम फीचर्ससह ही नवीन लाइनअप बाजारातील इतर मिड-रेंज स्मार्टफोनशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे. (फोटो सौजन्य – X)

Nothing Phone 3a व्हेरिअंट

Nothing Phone 3a ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू कलर्स या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. तसेच Nothing Phone 3a Pro हा ग्रे आणि ब्लैक वेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. Nothing Phone 3a च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. Nothing Phone 3a Pro च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये,8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे.

ऑफर्स

एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक आणि वनकार्ड वापरणारे ग्राहक 2000 रुपयांची बँक सूट मिळवू शकतात . याशिवाय, पहिल्या दिवशी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन्ही मॉडेल्सच्या सर्व व्हेरिएंटवर 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल. Phone 3a 11 मार्चपासून Flipkart, Flipkart Minutes, Croma, Vijay Sales आणि इतर रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल. तर, Phone 3a Pro 11 मार्चपासून Flipkart और Flipkart Minutes वर उपलब्ध होईल. विजय सेल्स आणि क्रोमा सारखे इतर किरकोळ विक्रेते 15 मार्चपासून त्याची विक्री सुरू करतील.

Power in perspective. Phone (3a) and Phone (3a) Pro. Two new signatures. Each refined to capture masterful shots. Pre-order now. pic.twitter.com/2wYuV3eE84 — Nothing (@nothing) March 4, 2025

Nothing Phone 3a चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Nothing Phone (3a) मध्ये 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो FHD+ रिजोल्यूशन (1080 x 2392 पिक्सेल्स) आणि 120Hz एडाप्टिव रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये 3,000 निट्स की पीक ब्राइटनेस आहे आणि हा Panda Glass ने प्रोटेक्टेड आहे. डिवाइसला IP64 रेटिंग आहे,ज्यामुळे ते धूळ आणि पाणी प्रतिरोधक बनते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये 4nm Qualcomm Snapdragon 7s Gen 3 चिपसेट आह. जे 8 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेजसह जोडलेले आहे.

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी, Nothing Phone (3a) मध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP Samsung प्राइमरी सेंसर (OIS + EIS सह), 50MP Samsung टेलीफोटो लेंस (2x ऑप्टिकल झूम, 4x इन-सेंसर झूम, 30x अल्ट्रा झूम आणि 8MP Sony अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. फ्रंटला 32MP Samsung सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 50W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की तो 19 मिनिटांत 50 टक्के पर्यंत चार्ज होतो आणि 56 मिनिटांत Phone (3a) पूर्णपणे चार्ज होतो. हे NothingOS 3.1 वर चालते, जे Android 15 वर आधारित आहे आणि 3 वर्षांचे Android अपडेट्स आणि 4 वर्षांचे सुरक्षा पॅच देण्याचे आश्वासन देते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, NFC, Wi-Fi 6 आणि ब्लूटूथ 5.4 यांचा समावेश आहे.

Nothing Phone 3a Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Nothing Phone (3a) Pro मध्ये बहुतेक स्पेसिफिकेशन स्टँडर्ड Phone (3a) सारखेच आहेत, ज्यात 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर, IP64 रेटिंग, आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर यांचा सामावेश आहे.

कॅमेरा

कॅमेरा सिस्टीममध्ये एक मोठा अपग्रेड देण्यात आला आहे. Phone (3a) Pro मध्ये 50MP Samsung प्रायमरी सेन्सर (OIS + EIS आणि 2x इन-सेंसर झूमसह), 50MP Sony पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (3x ऑप्टिकल झूम, 6x इन-सेंसर झूम, 60x अल्ट्रा झूम) आणि 8MP Sony अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. समोर, यात 50MP Samsung सेल्फी कॅमेरा आहे, जो स्टँडर्ड मॉडेलवरील 32MP पेक्षा चांगला आहे.

आयफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! iOS 18.4 beta 2 रिलीज; Apple Vision Pro अ‍ॅप आणि नवीन इमोजी फीचर्स मिळणार

बॅटरी आणि चार्जिंग

बॅटरी आणि चार्जिंग स्पीड सारखाच आहे, म्हणजेच यामध्ये 5,000mAh बॅटरी आणि 50W फास्ट चार्जिंग आहे. हे डिव्हाइस NothingOS 3.1 देखील चालवते, जे Android 15 वर आधारित आहे आणि त्याचे सॉफ्टवेअर सपोर्ट पॉलिसी समान आहे.

Web Title: Nothing phone 3a smartphone series launched in india know about specifications and details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • nothing
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
1

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
2

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
3

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
4

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.