Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

Vivo V80 Launched: विवोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये f/2.0 50MP ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2026 | 02:46 PM
लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • विवो व्हि 80 भारतात तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच
  • कंपनीने लाँच केलेल्या नव्या 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले
  • विवो व्हि 80 स्मार्टफोनची विशेषत: म्हणजेच याची ZEISS कॅमेरा सिस्टिम
Vivo Smartphone Launched:टेक आणि स्मार्टफोन कंपनी विवोने त्यांच्या व्हि-सिरीज अंतर्गत नवा Vivo V80 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कॅमेरा, डिस्प्ले आणि बॅटरीच्या मोठ्या अपग्रेडसह हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

विवो व्हि 80 ची किंमत

विवो व्हि 80 भारतात 8GB+128GB, 8GB+256GB आणि 8GB+512GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 62,999 रुपये, 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 69,999 रुपये आणि 8GB+512GB व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये आहे. हा नवा स्मार्टफोन सनराइज अँथम, होराइजन ब्लू आणि स्टेलर ब्लॅक या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन विवो इंडिया वेबसाईट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनची विक्री 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. मात्र या डिव्हाईसची प्री ऑर्डर सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य: Vivo) 

कंपनी लाँच ऑफर अंतर्गत, निवडक बँक कार्डसाठी 10 टक्के कॅशबॅक ऑफर करणार आहे. याव्यतिरिक्त 10 टक्के एक्सचेंज बोनसचा फायदा देखील मिळणार आहे. ग्राहक नो कॉस्ट ईएमआय पर्यायावर देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

विवो व्हि 80 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचे रिजोल्यूशन 2750×1260 पिक्सेल आहे आणि हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले 1.07 बिलियन कलर्स दाखवण्यासाठी सक्षम आहे आणि याची लोकल पीक ब्राइटनेस 5,000 निट्सपर्यंत आहे. फोनमध्ये 1.25mm पातळ बेजल देण्यात आले आहेत, ज्यामुळे स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देखील मिळणार आहे.

प्रोसेसर

परफॉर्मंससाठी विवो व्हि 80 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 4-nm तंत्रज्ञानावर आधारित ऑक्टा-कोअर चिपसेट आहे, ज्याची अधिकतम क्लॉक स्पीड 2.8GHz आहे. ग्राफीक्ससाठी या डिव्हाईसमध्ये एड्रेनो 722 जीपीयू मिळणार आहे. फोनमध्ये 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. विवोच्या एक्सटेंडेड रॅम सुविधेद्वारे अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम वापरण्याची सुविधा मिळणार आहे. स्टोरेजचे माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्याय मिळणार आहे.

कॅमेरा

विवो व्हि 80 स्मार्टफोनची विशेषत: म्हणजेच याची ZEISS कॅमेरा सिस्टिम आहे. फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेरा सेटअप मिळणार आहे, ज्यामध्ये f/1.88 50MP ZEISS ओआयएस मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये सोनी लायटिया 700V सेंसर आणि ओआयएस सपोर्ट मिळणार आहे. यासोबतच f/2.65 50MP ZEISS नाईट टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये सोनी IMX882 सेंसर मिळणार आहे. हा कॅमेरा ओआयएससह 3x ऑप्टिकल झूम आणि 100x पर्यंत झूमला सपोर्ट करतो. तिसरा कॅमेरा f/2.2 8MP ZEISS अल्ट्रा-वाइड अँगल आहे, ज्याची फील्ड ऑफ व्यू 115 डिग्री आहे.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 50MP ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात ऑटोफोकस आणि 92 डिग्री फील्ड ऑफ व्यू मिळणार आहे. फोन 4K सिनेमॅटिक व्हिडिओसह 4K 60fps व्हिडीओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो.

बॅटरी

फोनमध्ये 7,200mAh बॅटरी दिली आहे, जी व्हि-सिरीजमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी क्षमता आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन सतत नेविगेशनमध्ये 14 तासांपर्यंत आणि लोकल व्हिडीओ प्लेबॅकमध्ये 39.5 तासांपर्यंत चालू शकतो. फोन चार्ज करण्यासाठी 90W फ्लॅशचार्ज सपोर्ट दिला आहे. डिव्हाईसची बॅटरी कमी वेळात चार्ज केली जाऊ शकते.

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स

कनेक्टिविटी फीचर्स

विवो व्हि 80 स्मार्टफोन भारतात अँड्रॉईड 17 आधारित ओरिजीनओएस 7 सह लाँच करण्यात आला आहे. विवो व्हि 80 हा व्हि-सिरीजचा पहिला स्मार्टफोन आहे, ज्याला ओरिजीनओएस 7 सह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये एआयसंबंधित 30 पेक्षा जास्त क्रिएटिव टूल्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये लाईव्ह स्टिकर कोलाज आणि एआय दिवाळी पोर्ट्रेट 2.0 सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

फोनमध्ये ग्लास बॅक आणि 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळणार आहे. डिव्हाईसला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, डुअल-बँड वायफाय, एनएफसी, आयआर ब्लास्टर आणि ब्लूटूथ 5.4 सह डुअल सिम सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पीकर्स देखील मिळणार आहेत.

Web Title: Vivo v80 launched in india today with amazing features and premium look hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज
2

आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स
3

स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
4

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.