6000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह धमाका करणार OnePlus चा ब्रँड न्यू स्मार्टफोन, वाचा स्पेसिफिकेशन्स
स्मार्टफोन कंपनी OnePlus चा नवीन स्मार्टफोन OnePlus 13 Mini लवकरच लाँच होणार आहे. अलीकडेच कंपनीने OnePlus 13 आणि OnePlus 13R हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. यानंतर आता कंपनी या सिरीजधील नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. आता लवकरच भारतात OnePlus चा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. हा आगामी स्मार्टफोन OnePlus 13 Mini किंवा 13T या नावाने भारतात लाँच केला जाऊ शकतो. अद्याप कंपनीने या स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
स्मार्टफोनचं नाव काय असेल ते स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स याबाबत कंपनीने कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार कंपनीचा नवीन आगामी स्मार्टफोन OnePlus 13 Mini या नावाने भारतात लाँच केला जाऊ शकतो. सध्या, ताज्या अहवालात OnePlus 13 Mini स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दलची माहिती समोर आली आहे. तसेच काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्सचा अहवाल देखील समोर आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
लोकप्रिय टिपस्टर Digital Chat Station ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमध्ये OnePlus 13 Mini च्या बॅटरीबाबत दावा करण्यात आला आहे. पोस्टमध्ये सांगितलं आहे की, OnePlus 13 Mini स्मार्टफोन 6,000mAh बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. लहान आकाराच्या कॉम्पॅक्ट फोनमध्ये या क्षमतेची बॅटरी कशी उपलब्ध होईल हे पाहणे मनोरंजक असेल.
यासोबतच, टिपस्टरने असेही सांगितले आहे की वनप्लस या वर्षी लाँच होणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये जास्त क्षमतेची बॅटरी देईल. हे स्मार्टफोन या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत लाँच केले जातील. कंपनी या स्मार्टफोन्समध्ये 6500mAh ते 7000mAh पर्यंतची बॅटरी देईल.
आगामी OnePlus 13 Mini स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, OnePlus 13 स्मार्टफोनच्या बॅक पॅनलमध्ये बार-शेप ड्युअल कॅमेरा डिझाइन दिले जाईल. कंपनी या फोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले देईल. असा अंदाज आहे की हा वनप्लस स्मार्टफोन मेटल फ्रेम आणि ग्लास बॅकसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो.
New UPI Rule: ट्रांजेक्शन फेल झाल्यास ताबडतोब मिळणार रिफंड, काय सांगतो UPI चा नवीन नियम? जाणून घ्या
OnePlus 13 Mini स्मार्टफोनच्या डिस्प्लेबद्दल, असे सांगितले जात आहे की या फोनमध्ये 6.31-इंचाचा 1.5K रिझोल्यूशन असलेला LTPO OLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. यासोबतच, हा फोन क्वालकॉमच्या Snapdragon 8 Elite चिपसेटसह लाँच केला जाईल. कंपनीने OnePlus 13 सिरीजमध्ये लाँच केलेल्या फोनमध्येही हाच प्रोसेसर दिला होता. कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 13 Mini मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असेल, त्यासोबत 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा उपलब्ध असेल, जो 2X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल.
सध्या वनप्लसच्या आगामी फोनबद्दल इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा फोन एप्रिल 2025 पर्यंत लाँच केला जाऊ शकतो. सध्या त्याची किंमत आणि भारतात लाँचिंगबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.