Vivo V50 Launched: पावरफुल फीचर्ससह Vivo च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, डिझाईन अशी की पाहताच क्षणी प्रेमात पडाल
स्मार्टफोन कंपनी Vivo चा नवीन स्मार्टफोन आज 17 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच करण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह ईव्हेंटमध्ये हा Vivo चा नवीन स्मार्टफोन Vivo V50 लाँच करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा फोन चर्चेत होता. त्याचे काही स्पेसिफिकेशन्स देखील लिक झाले होते. त्यामुळे हा नवीनतम स्मार्टफोन भारतात कधी एंट्री करणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. आणि आता अखेर सर्वांची प्रतिक्षा संपली आहे. कारण Vivo V50 आज भारतात लाँच झाला आहे.
या दिवशी लाँच होणार Apple चा नवीन फॅमिली मेंबर, टिम कुक ने जारी केली टीझर! युजर्सची उत्सुकता शिगेला…
V40 चा उत्तराधिकारी म्हणून हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. Vivo V50 मध्ये अनेक अपग्रेड फीचर्स देण्यात आले आहेत. V सिरीजमध्ये लाँच होणारा हा कंपनीचा या वर्षीचा पहिला फोन आहे. हा स्मार्टफोन मिडरेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरीसह खास डिझाईन देण्यात आले आहे. जे अगदी कोणत्याही स्मार्टफोन प्रेमीला भुरळ घालू शकतं. या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला तर मग या स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)
Vivo ने त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वाड-कर्व्ह डिस्प्ले दिला आहे, जो डायमंड शील्ड ग्लास प्रोटेक्शनसह येतो. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी याला IP68+IP69 रेटिंग मिळाले आहे. हा स्मार्टफोन टायटॅनियम ग्रे, रोझ रेड आणि स्टारी ब्लू रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या फोनमध्ये अनेक AI फीचर्स दिले आहेत. यामध्ये सर्कल टू सर्च, AI ट्रान्सक्रिप्ट, AI लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन इत्यादींचा समावेश आहे.
प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, Vivo V50 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट आहे, जो 12 जीबी रॅमसह जोडलेला आहे.
Vivo च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 50MP चा अल्ट्रावाइड लेन्स आहे. हे दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात ऑटो फोकससह 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे. त्यात वेडिंग पोर्ट्रेट स्टुडिओ आहे, जे लग्नात उत्तम फोटो काढण्यास मदत करेल. ज्यामुळे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.
बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यात 6,000 mAh बॅटरी दिली आहे. याबद्दल कंपनीचा दावा आहे की, इतक्या शक्तिशाली बॅटरीसह येणारा हा त्यांच्या सेगमेंटमधील सर्वात पातळ फोन आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo V50 ची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या 256GB व्हेरिएंटसाठी तुम्हाला 36,999 रुपये द्यावे लागतील. आजपासून Vivo V50 ची प्री-बुकिंग सुरु झाली आहे आणि त्याची विक्री 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. ते कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.