OnePlus 13s: भारतात लाँच झाला दमदार कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप Smartphone, या दिवशी सुरु होणार विक्री
लोकप्रिय टेक कंपनी वनप्लसने आज 5 जून रोजी भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन आणि दमदार कॉम्पॅक्ट फोन OnePlus 13s या नावाने लाँच करण्यात आला आहे. लाँच करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन त्याच्या ऑल न्यू लुकसह वनप्लस 13 सीरीजमधील एक जबरदस्त ऑप्शन ठरणार आहे. लेटेस्ट स्मार्टफोनची खासियत म्हणजे हा ‘कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप’ आहे. याचा अर्थ या डिव्हाईसमध्ये टॉप-टियर स्पेक्स देण्यात आले आहेत.
वनप्लस 13s मध्ये 6.32-इंच LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्सपर्यंत स्क्रीन हाय ब्राइटनेस मोड देण्यात आली आहे. रेगुलर पीक ब्राइटनेस 800 निट्स असते आणि पॅनल डॉल्बी विजनसह HDR ला सपोर्ट करतो. बायोमेट्रिक्ससाठी स्टीरियो स्पीकर आणि ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहेत. कनेक्टिविटीसाठी या नवीन डिव्हाईसमध्ये 5.5G, WiFi 7 आणि NFC सह डुअल सिम स्लॉट देखील आहे. (फोटो सौजन्य – X)
OnePlus 13s launched in India pic.twitter.com/hUuJ8pu8KK
— Mukul Sharma (@stufflistings) June 5, 2025
OnePlus 13s मध्ये ग्लास आणि मेटल चेसिस आहे आणि हा केवळ 8.15 मिमीचा आहे आणि याचे वजन 185 ग्रॅम आहे. डिव्हाईसला ब्लॅक वेलवेट, पिंक सॅटिन आणि ग्रीन सिल्कमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने असं सांगितलं आहे की, शेवटचे दोन ऑप्शन एक खास वेलवेट ग्लास टेक्नोलॉजीचा वापर करून तयार करण्यात आले आहेत, जो बॅक पॅनलमध्ये एक सॉफ्ट टच माइक्रोस्कोपिक टेक्सचर देण्यात आलं आहे. दुसरीकडे ब्लॅक व्हेरिअंटमध्ये मेटालिक सँड फिनिश देण्यात आलं आहे. तर अलर्ट स्लाइडरच्या जागी नवीन प्लस की देण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स अनेक प्रकारच्या शॉर्टकर्टचा वापर करू शकतात.
फोनमध्ये Android 15 सह OxygenOS 15 देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर हे, जो 12GB च्या LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेजसह येतो.
नवीन आणि लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 5850mAh ची बॅटरी आणि 80W पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे डिव्हाईस 13s बायपास चार्जिंग देखील ऑफर करते असा दावा कंपनीने केला आहे. याचा अर्थ गेमिंगदरम्यान फोन बॅटरीवर अवलंबून राहत नाही. डिव्हाईसमध्ये एक खास कूलिंग सिस्टम देखाील आहे, ज्यामध्ये मोठा 3D क्रायो-वेलोसिटी वेपर चेंबर आहे.
Stronger. Smarter. Smaller. The #OnePlus13s is here.
Pre-order now: https://t.co/wPkrNOw1NF pic.twitter.com/3u1tE9DT7E— OnePlus India (@OnePlus_IN) June 5, 2025
फोटोग्राफी लवर्ससाठी डिव्हाईसमध्ये एक डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ऑप्टिकली स्टेबिलाइज़्ड f/1.8 अपर्चर लेंस वाला 50-मेगापिक्सेलचा सोनी LYT-700 प्रायमरी सेंसर आणि दूसरा 50-मेगापिक्सेलचा 2x टेलीफोटो लेंस आहे. डिव्हाईसचा फ्रंट कॅमेरा 32-मेगापिक्सलचा आहे. ज्यामध्ये ऑटोफोकसची सुविधा आहे.
वनप्लसने 13s चे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजचे बेस व्हेरिअंट 54,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत iPhone 16 पेक्षा कमी आहे. 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजवाल्या टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे. हा फोन 5 जूनपासून म्हणजेच आजपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे, तर त्याची विक्री 12 जून रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.