आधी नोकरीवरून हकललं मग लगेचच पुन्हा बोलावलं! OpenAI आणि Sam Altman यांच्यातील ड्रामा दिसणार मोठ्या पडद्यावर, कोण आहेत डायरेक्टर?
तुम्हाला आठवतंय का लोकप्रिय AI आणि टेक कंपनी ओपनएआयमध्ये 2023 साली एक प्रसंग घडला होता. कंपनीने अचानक OpenAI चे CEO सॅम ऑल्टमॅन यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं आणि त्यानंतर 5 दिवसांनी पुन्हा बोलावलं होतं. या घटनेची चर्चा संपूर्ण जगभरात सुरु होती. या प्रसंगला अनेकांनी ड्रामा म्हटलं होतं. पण आता याच ड्राम्यावर एक चित्रपट तयार केला जाणार आहे. या चित्रपटाचं नाव काय आहे, तो कोण दिग्दर्शित करणार आहे, याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem
द हॉलीवुड रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार, ओपनएआय आणि सॅम ऑल्टमॅन यांच्यामध्ये घडलेल्या प्रसंगांवर हा चित्रपट आधारित असणार आहे. या चित्रपटाचं नाव आर्टिफिशियल असणार आहे. Amazon MGM Studios द्वारे हा चित्रपट तयार केला जात आहे. आगामी चित्रपट 2023 च्या त्या नाट्यमय दिवसांची कहाणी सांगेल जेव्हा तंत्रज्ञान जग पूर्णपणे हादरले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
या चित्रपटाची पटकथा सॅटरडे नाइट लाइवचे लेखक साइमन रिच यांनी लिहीली आहे. हा चित्रपट एक गंभीर बोर्डरूम ड्रामा असाल तरी देखील यामध्ये एक मजेदार आणि अनोखा अंदाज पहायला मिळणार आहे. ओपनएआय आणि सॅम ऑल्टमॅन यांच्यात नेमकं काय घडलं, सॅम ऑल्टमॅन यांना नोकरीवरून का काढून टाकण्यात आलं होत आणि त्यानंतर काहीच दिवसांत कंपनीने त्यांना पुन्हा का बोलावलं हा सर्व ड्रामा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
आर्टिफिशियल या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक लुका ग्वाडाग्निनो हे करू शकतात. लुका ग्वाडाग्निनो यांनी कॉल मी बाय योर नेम आणि चॅलेंजर्स सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. कास्टिंगबद्दल बोलायचे झाले तर, अँड्र्यू गारफिल्ड हे सॅम ऑल्टमनची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. मोनिका बारबारो माजी सीईओ मीरा मूर्तीची भूमिका साकारू शकते, ज्यांनी काही काळ सीईओ पद भूषवले होते. युरा बोरिसोव्ह ओपनएआयच्या सह-संस्थापक आणि ऑल्टमनला काढून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इल्या सुत्स्केव्हरची भूमिका साकारू शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सर्वांनाच या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. चित्रपट कधी प्रदर्शित केला जाणार, याबाबत देखील अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
17 नोव्हेंबर 2023 रोजी OpenAI च्या बोर्डने अचानक सॅम ऑल्टमॅन यांना कपंनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण टेक इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कर्मचारी आणि गुंतवणूकदारांनी ऑल्टमनवर परत येण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर, अवघ्या पाच दिवसांनी ऑल्टमन सीईओ म्हणून परतले.