किती तास झोपतात Google चे सिईओ सुंदर पिचाई? स्वत:च दिली माहिती; म्हणाले, 'माझ्यासाठी झोप महत्त्वाची...'
जगातील प्रसिद्ध टेक दिगज्जांपैकी एक असलेले गूगलचे सीईओ सुंदर पिचाई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सहसा ही चर्चा नवीन अपडेट आणि फीचर्ससंबंधित असते. आता सुंदर पिचाई पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचं कारण आहे सुंदर पिचाई यांचं शेड्यूल. पिचाई यांनी त्यांच्या पर्सनल लाइफ आणि डेली रूटीनबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. शिवाय यावेळी त्यांनी बदलत्या टेक इंडस्ट्रीबाबत देखील सांगितलं.
World Environment Day 2025: टेक्नोलॉजीही करू शकते पृथ्वीचं रक्षण, फक्त फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स
या मुलाखतीमध्ये पिचाई यांना विचारण्यात आलं होतं की, त्यांच्या बिझी शेड्युलमधून ते झोपेसाठी वेळ कसा काढतात. या प्रश्नाचं उत्तर देताना पिचाई यांनी म्हटलं होतं की, ‘झोप अत्यंत महत्त्वाची आहे. मी प्रयत्न करतो की रोज कमीत कमी 6 तास तरी झोपू शकेन.’ त्यांनी म्हटलं की, ते किमान 6 तासांची झोप घेतात. बदलत्या टेक इंडस्ट्रीबाबत देखील पिचाई यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पिचाई यांनी म्हटलं आहे की, टेक इंडस्ट्रीमध्ये कामं करणं खरंच खूप रोमांचक आहे. त्यांनी सांगितलं की, टेक्नोलॉजीच्या जगात सतत बदल होत आहेत. या बदलांसोबतच चालणं एक चॅलेंज देखील आहे आणि एक मोटिवेशन देखील आहे. या वेगाने बदलणाऱ्या जगात सवत:साठी कसा वेळ काढला जाऊ शकतो याबाबत देखील पिचाई यांनी सांगितलं आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितलं आहे की, मी नेहमीच रात्री उशिरापर्यंत काम करणारा माणूस आहे. माझे बहुतेक काम रात्री केले जाते. म्हणजेच, दिवसभराच्या बैठका आणि कामानंतर, ते रात्री स्वतःसाठी थोडा वेळ काढतात आणि त्यानंतरच त्यांना थोडा आराम वाटतो.
गेल्या वर्षी पिचाई यांनी त्यांच्या सकाळची सुरुवात कशी केली जाते, याबाबत काही मजेदार गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं की, ते त्यांच्या दिवसाची सुरुवात कोणतेही वर्तमानपत्र वाचून किंवा मेनस्ट्रीम न्यूज वेबसाइट जसे The Wall Street Journal किंवा The New York Times ने करत नाहीत. तर ते एक खास टेक वेबसाइट Techmeme ला फॉलो करतात. त्यांचं असं मत आहे की ही वेबसाईट जगभरातील टेक न्यूज एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.
केवळ पिचाईच नाहीत तर Techmeme अनेक मोठ्या टेक लीडर्सची आवडती वेबसाईट आहे. यामध्ये फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी सारखी मोठी नावे आहेत. हे सर्व लोक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी दररोज या वेबसाइटचा वापर करतात.