
लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?
यापूर्वी कंपनीने OnePlus 15R ची किंमत 2500 रुपयांनी वाढवली होती. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता कंपनीने ग्राहकांना मोठा झटका देत स्मार्टफोनची किंमत पुन्हा एकदा वाढवली आहे. कंपनीने आता या स्मार्टफोनची किंमत 4,500 रुपयांनी वाढवली आहे. म्हणजेच स्मार्टफोन आता एकूण 7 हजार रुपयांनी महागला आहे. आता OnePlus 15R ची नवीन किंमत 54,999 रुपये झाली आहे. कंपनीने स्मार्टफोनची किंमत पुन्हा एकदा वाढवण्याचे कारण अद्याप सांगितलं नाही. मात्र, रॅम आणि स्टोरेजच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत, असे मानले जाते. (फोटो सौजन्य – Pinterest)
वनप्लस 15 आर चे 12GB+256GB व्हेरिअंट यापूर्वी 47,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होते. मात्र आता स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची नवी किंमत 54,999 रुपये झाली आहे. तर वनप्लस 15 आर चे 12GB+512GB व्हेरिअंट यापूर्वी 52,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होते. मात्र आता डिव्हाईसच्या या व्हेरिअंटची नवी किंमत 59,999 रुपये झाली आहे.
लाँचिंगनंतर कंपनीने दुसऱ्यांदा या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. आता ग्राहकांना एकूण 7 हजार रुपये जास्त खर्च करून हा स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. स्मार्टफोनची नवीन किंमत ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर देखील अपडेट झाली आहे. कंपनीने स्मार्टफोनची किंमत दुसऱ्यांदा वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा झटका लागला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
वनप्लस स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. वनप्लसचा हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 7,400mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वनप्लसच्या या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन चारकोल ब्लॅक, मिंट ब्रीज आणि इलेक्ट्रिक वॉयलेट रंगात खरेदी करू शकणार आहेत. वनप्लसचा हा फोन IP66, IP68, IP69, आणि IP69K रेटिंगसह उपलब्ध आहे.
Ans: OnePlus 15R ची नवीन सुरुवातीची किंमत आता 54,999 रुपये झाली आहे.
Ans: हा स्मार्टफोन लाँचनंतर एकूण 7 हजार रुपयांनी महागला आहे.
Ans: कंपनीने लाँचनंतर दोन वेळा या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे.