Free Fire MAX: नव्या ईव्हेंटने वाढला प्लेअर्सचा उत्साह! गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी... फॉलो करा या स्टेप्स
रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पिनसाठी प्लेअर्सना इन गेम करंसी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. गेममध्ये सुरु झालेला हा नवीन ईव्हेंट पुढील 8 ते 10 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान प्लेअर्स स्पिन करून अनेक रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. सहसा, गेममध्ये नवीन वस्तू मिळवण्यासाठी जास्तीचे डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अत्यंत कमी डायमंड्सचा वापर करून नवीन रिवॉर्ड्स मिळतात. (फोटो सौजन्य – YouTube)
एमपी5 एक्स पॅराफल ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 नाही तर केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.






