iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय
सध्या आयफोन 15 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर ग्राहक गॅलेक्सी एस 24 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. सॅमसंग स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 10 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच अमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे, तर आयफोन 15 मध्ये 6.1 इंच डिस्प्ले दिला आहे. आयफोनची स्क्रीन जास्त शार्प मानली जाते. कारण यामध्ये पिक्सेल डेंसिटी जास्त आहे. व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी आयफोनमध्ये HDR10 आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यामुळे कंटेट अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकता. तर सॅमसंग स्मार्टफोनमधील 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रॉलिंग आणि गेमिंग अधिस स्मूद होते. आयफोन 15 च्या बेस मॉडेलमध्ये 60Hz डिस्प्ले दिला आहे, जो यूजर्सना थोडा जुना वाटू शकतो. पण ब्राईटनेसच्या बाबतीत दोन्ही स्मार्टफोन्स समान आहेत.
कॅमेऱ्याच्या बाबतीत दोन्ही स्मार्टफोन्स वेगवेगळ्या यूजर्सना टार्गेट करतात. गॅलेक्सी एस 24 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड आणि 10MP टेलीफोटो लेंस समाविष्ट आहे. तर आयफोन 15 मध्ये 48MP मुख्य कॅमेरा आणि 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 3x ऑप्टिकल झूम ऑफर केली जाते, ज्यामुळे जास्त क्लिअर येतो. आयफोन 15 मध्ये वेगळा टेलीफोटो लेंस नाही. मात्र मेन सेंसरद्वारे 2x झूम ऑफर केले जाते. नाईट फोटोग्राफीमध्ये आयफोन 15 अधिक चांगली फोटोग्राफी करू शकतो. याची इमेज प्रोसेसिंग आणि नॉइज कंट्रोल जास्त दमदार मानला जात आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंगबद्दल बोलायचं झालं तर, गॅलेक्सी एस 24 मध्ये 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देण्यात आला आहे. मात्र सिनेमॅटिक व्हिडीओ आणि नैसर्गिक रंगांसाठी आयफोन आजही यूजर्सची पहिली पसंती आहे.
Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…
आयफोन 15 मध्ये अॅपलचा A16 बायोनिक चिपसेट दिला आहे. जो सिंगल-कोर परफॉर्मंससाठी वेगवान मानला जातो. ॲप उघडणे, व्हिडिओ एडिटिंग आणि सुरळीत अनुभवासाठी हे उत्तम काम करते. तर गॅलेक्सी S24 देखील फ्लॅगशिप लेवल परफॉर्मंस ऑफर करतो, ज्यामुळे मल्टीटास्किंग अतिशय मजबूत होते. सॅमसंगने गॅलेक्सी एस 24 साठी 7 वर्षांपर्यंत अँड्रॉईड आणि सुरक्षा अपडेट देण्याचे वचन दिले आहे. तर सॅमसंग स्मार्टफोनमध्ये लाइव ट्रांसलेशन, फोटो एडिटिंग सुझाव आणि अनेक AI टूल्स आहेत, ज्यांचा रोजच्या जीवनात वापर होतो.






