अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16... 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
वनप्लस 16 स्मार्टफोनला एका गेमिंग डिव्हाईसच्या रुपात लाँच करण्याची प्लॅनिंग कंपनी करत आहे. हा एक ऑलराउंडर फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार आहे. कंपनी त्यांचा हा आगामी स्मार्टफोन न्यू जेनरेशन फेंगची गेमिंग कर्नेलसह लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे. याबाबत वनप्लसचं असं म्हणणं आहे की, हे हार्डवेअर रिसोर्स कॉर्डिनेशनचे काम करणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 185 एफपीएसच्या कमाल फ्रेम रेटसह नेटिव्ह गेमिंगचा अनुभव देईल. कंपनीने म्हटलं आहे की, या स्तरावरील गेमिंग परफॉर्मंससाठी त्यांनी वेगळ्या कोणत्याही चिपचा वापर केला नाही. तथापी, कंपनीचं असं म्हणणं आहे की, त्यांनी या फोनमध्ये नवीन सेल्फ डेवलप थ्री-चिप इस्पोर्ट्स सिस्टिमचा वापर केला आहे. हे नेटवर्क, टच रिस्पॉन्स आणि डिस्प्ले रिलेटेड प्रोसेसिंग हँडल करते.
वनप्लसचं असं म्हणणं आहे की, ही चिप सिस्टिम कनेक्शन स्टेबिलिटी, टच रिस्पॉन्स आणि विजुअल क्लॅरिटी देखील सुधारते. या फोनमध्ये कंपनीने 185Hz डिस्प्ले दिला आहे, जो हाय फ्रेम रेट गेमिंग आणि फास्टर विजुअल रिस्पॉन्स ऑफर करणार आहे. वनप्लस 16 बाबत कंपनीचं असं म्हणणं आहे की, तो नेटिव्ह 185 एफपीएससह विविध गेमिंग प्लॅटफॉर्मला सपोर्ट करेल. यामध्ये पीस एलिट, एरिना ब्रेकआउट, निझान: फ्युचर आणि नारुतो मोबाईल यांसारख्या गेम्सचा समावेश आहे. कंपनीने या आगामी फोनचे रिस्पॉन्स एडवांटेजचे 1-0डिवाइस टेस्ट देखील सादर केले. कंपनीने असा दावा केला आहे की, हे डिव्हाईस दुसऱ्या डिव्हाईसच्या तुलनेत एकसारखे नेटवर्क आणि गेमप्लेमध्ये अधिक चांगला परफॉर्मंस देतो.
वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 प्रोसेसर मिळणार आहे. यापूर्वी काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, ज्यासोबत 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा लेंस दिला जाऊ शकतो. वनप्लसचा आगामी स्मार्टफोन विविध रंगांच्या पर्यायांत लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी कंपनी काही डिटेल्स शेअर करण्याची अपेक्षा आहे.






