OnePlus युजर्सची प्रतीक्षा लवकरच संपणार! नवीन नॉर्ड सीरीज स्मार्टफोन्स येणार भेटीला, फीचर्स आणि किंमत वाचून तुम्हीही व्हाल हैराण
OnePlus च्या नॉर्ड सिरीजअंतर्गत कंपनी नॉर्ड 5 आणि नॉर्ड CE 5 हे दोन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, स्मार्टफोन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असणार आहेत. OnePlus Nord CE 5 गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे, याचं कारण म्हणजे या स्मार्टफोनचे डिझाईन, बॅटरी आणि प्रोसेसर.
शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होतोय Amazon प्राइम डे सेल, Top Deals चा झाला खुलासा
लाँचिंगपूर्वीच कंपनीने स्मार्टफोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंशन 8350 एपेक्स चिपसेटने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 7100 mAh बॅटरी असणार आहे, याशिवाय या डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे, असं देखील सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वनप्लसने आगामी नॉर्ड CE 5 च्या डिझाईनचा खुलासा केला आहे. यामध्ये तुम्हाला मॅट फिनिश पाहायला मिळणार आहे, जो आधीच्या मॉडेलपेक्षा पुर्णपणे वेगळा आहे. रिअर पॅनलवर पिल-शेप्ड कॅमेरा आइलँड असणार आहे, ज्यामध्ये डुअल-कॅमेरा सेटअप मिळणार आहे. आतापर्यंत कंपनीने खुलासा केला आहे की, स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाणार आहे. वनप्लस नॉर्ड CE 5 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.77-इंच OLED डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. हा स्मार्टफोन गेमिंग आणि मीडिया दोन्हीसाठी उत्तम आणि इमर्सिव व्यूइंग एक्सपीरियंस ऑफर करणार आहे.
नॉर्ड CE 5 मध्ये मीडियाटेक 8350 एपेक्स चिपसेट असणार आहे, जो 4nm आर्किटेक्चरवर बेस्ड एक ऑक्टा-कोर प्रोसेसर असणार आहे. यासोबतच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB, 256GB स्टोरेज व्हेरिअंट मिळणार आहे. फोनमध्ये Android 15 बेस्ड OxygenOS 15 मिळणार आहे. यावेळी लाँच केल्या जाणाऱ्या OnePlus च्या ढासू फोनमध्ये 7,100 ची मोठी बॅटरी मिळणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 2.5 दिवस टिकू शकते. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी, 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी असेल.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर, तो Nord CE 5 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. या कॅमेऱ्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि अनेक AI फीचर्स देखील असतील. तसेच, डिव्हाइसमध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी डिव्हाइसमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा असेल.
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या डिव्हाइसच्या बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे 25 हजार रुपये असू शकते, तर 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 27 हजार रुपयांमध्ये उपलब्ध असू शकते.