भारतीय बाजारात OnePlus च्या नव्या ईयरबड्सची एंट्री! अॅक्टिव नॉइस कँसलेशन आणि रियल-टाइम ट्रांसलेशनने सुसज्ज, इतकी आहे किंमत
OnePlus ने भारतीय बाजारात त्यांचे नवीन ईअरबड्स लाँच केले आहे. नवीन ईयरबड्सनी OnePlus Nord Buds 4 Pro या नावाने भारतीय बाजारात एंट्री केली आहे. Nord सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या ईयरबड्समध्ये अॅक्टिव नॉइस कँसलेशन (ANC) फीचर देण्यात आले आहे. कंपनीचे लेटेस्ट ईयरबड्स ओवल-शेप वर्टिकल केस डिझाईनसह भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, मागील वर्जनच्या तुलनेत लेटेस्ट ईयरबड्सचा आकार 10 टक्क्यांनी लहान आहे.
वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहे. यामध्ये ग्रे आणि ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन ईअरबड्सची किंमत 3,999 रुपये आहे. ग्राहक हे डिव्हाईस ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, वनप्लस ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदी करू शकतात. याव्यतिरिक्त ब्लिंकइट 23 मार्चपासून कंपनीच्या भागीदार रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. यासोबतच, लाँच ऑफर अंतर्गत कंपनी या नवीन ईअरबड्सच्या खरेदीवर ग्राहकांना 200 रुपयांची सूट देत आहे. (फोटो सौजन्य – वनप्लस)
वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो ईयरबड्स रियल-टाइम ट्रांसलेशन फीचरसह लाँच करण्यात आले आहेत. हे डिव्हाईस इंग्लिश, हिंदी, स्पेनिश आणि फ्रेंच लँग्वेज सपोर्टसह उपलब्ध आहेत. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना HeyMelody अॅपचा वापर करावा लागणार आहे. वनप्लसच्या लेटेस्ट ईयरबड्समधील सिंगल बड्सचे वजन 4.4 ग्रॅम आहे. वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो केसमध्ये 530mAh बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल बड्समध्ये 62mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाईस एका चार्जवर ANC शिवाय 54 तासांपर्यंत आणि एका चार्जवर 13 तासांपर्यंत स्टँडअलोन प्लेबॅक देतात. हे वनप्लस बड्स फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो मध्ये 12mm टायटॅनियम-कोटेड डायनमिक ड्राइवर देणयात आले आहे. या डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ 6.0, एलएचडीसी 5.0 एसबीसी आणि एएसी कोडेक्स दिले आहेत. वनप्लसचे हे ईयरबड्स 55dB पर्यंत अॅक्टिव नॉइस कँसलेशन (ANC), ट्रांसपेरेंट मोड आणि क्लीयर कॉल ऑफर करतात. एआई कॉल नॉइस केंसलेशनसाठी यामध्ये 6 माइक्रोफोन (3 माइकवर बड्स) चा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच या ईयरबड्समध्ये एआई फीचर्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. वनप्लसने टच कंट्रोल फीचर पुन्हा सादर केले आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते ट्रॅक बदलू शकतात, व्हॉइस असिस्टंट, प्ले आणि पॉज, व्हॉल्यूम कंट्रोल करू शकतात.






