सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या Ghibli-Style फोटोंवर लागला बॅन, कॉपीराईटच्या आरोपांमुळे OpenAI ने घेतला निर्णय
28 मार्च रोजी आज सकाळपासून सोळल मीडियावर Ghibli-Style फोटोंनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. कलाकारांपासून अगदी सर्वसामान्यांपर्यंत सर्वत्र Ghibli-Style ईमेजची क्रेझ निर्माण झाली होती. अनेकांनी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच मित्र मैत्रिणींचे Ghibli-Style ईमेज तयार केल्या होत्या. Ghibli-Style ईमेज तयार करण्यासाठी तुम्हाला OpenAI चा चॅटजीपीटी, एलन मस्कचा ग्रोक मदत करत होता. मात्र आता तुम्ही Ghibli-Style ईमेज तयार करू शकणार नाहीत. कारण या Ghibli-Style ईमेजवर आता बॅन लावण्यात आला आहे.
या फीचरमुळे OpenAI अडचणीत सापडला आहे. त्याच्या कॉपीराईटचे आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता अखेर हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळपासून अनेकांनी चॅटजीपीटी आणि ग्रोकच्या मदतीने वेगवेगळ्या Ghibli-Style ईमेज तयार केल्या होत्या. Ghibli-Style ईमेज तयार करण्यासाठी तुम्हाला चॅटजीपीटी आणि ग्रोकवर ईमेज अपलोड करून Create Ghibli Photo असा प्रॉम्प्ट द्यावा लागत होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
यानंतर काही क्षणातच तुमच्या समोर Ghibli-Style ईमेज तयार झाली असायची. मात्र आता ईमेज अपलोड करून Create Ghibli Photo असा प्रॉम्प्ट दिल्यानंतर चॅटजीपीटी आणि ग्रोकवर Ghibli-Style ईमेज तयार होत नाही. या ठिकाणी तुम्हाला Ghibli style image generator वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. OpenAI ने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्स प्रचंड नाराज झाले आहेत. अनेकजण हे टूल खूप एन्जॉय करत होते. मात्र आता हे टूल बॅन करण्यात आलं आहे.
It was reported yesterday that OpenAI will be doing 12.7B revenue/year.
It’s CEO is advertising his product by infringing the copyright of an artist who at best will do less than 1% of that on his lifetime (Hayao Miyazaki)
I love to play with these tools too, but actively… pic.twitter.com/ibshG5KVN3
— Emanuel Sá (@emanuelsa) March 27, 2025
चॅटजीपीटी युजर्स त्यांचे फोटो स्टुडिओ Ghibli शैलीतील अॅनिममध्ये रूपांतरित करत आहेत. पण आता या टूलमुळे ओपनएआय अडचणीत सापडलं आहे. यामुळे कॉपीराइटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ओपनएआयवर स्टुडिओ Ghibli चे मूळ निर्माते हयाओ मियाझाकी यांच्या ग्राफिक्स कामांचा परवानगीशिवाय वापर केल्याचा आरोप आहे.
Ghibli ट्रेंड व्हायरल होताच, ओपनएआय कॉपीराइट वादात अडकले आहे. स्केचचे सह-संस्थापक इमॅन्युएल सा यांनी ओपनएआयवर मियाझाकीच्या परवानगीशिवाय स्केचचे सॉफ्टवेअर वापरल्याचा आणि त्यातून नफा मिळवल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “अब्जावधी कमाई करणारी AI कंपनी, अशा कलाकाराच्या कलाशैलीचा फायदा घेत आहे जो त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याचा एक अंशही कमवू शकणार नाही, हे चुकीचे आहे.”
सा चे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, ओपनएआयने त्यांचे धोरण बदलले. आता ओपनएआयने स्पष्ट केले आहे की युजर्सना स्टुडिओ Ghibli किंवा मियाझाकीच्या नावाचा वापर करून प्रतिमा तयार करण्याची परवानगी दिली जाणार नाही कारण ते कॉपीराइट उल्लंघन असेल. यामुळे आता युजर्स यापुढे ChatGPT वर Ghibli किंवा मियाझाकीशी संबंधित प्रॉम्प्टवरून प्रतिमा तयार करू शकणार नाहीत.