
फीचर्सचा जलवा आणि बॅटरीची कमाल... नवा Oppo स्मार्टफोन यूजर्ससाठी ठरणार खास, किंमत केवळ इतकी
चीनमध्ये Oppo A6k स्मार्टफोन 8GB+256GB, 8GB + 512GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 8GB+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 27,000 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये ठेवली आहे. Oppo A6k तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे, ज्यामध्ये डॉन गोल्ड, सीशेल व्हाइट आणि ट्वाइलाइट ब्लू (चीनी भाषेतून अनुवादित) यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये सुरु करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Oppo)
डुअल सिम असलेला Oppo A6k 5G स्मार्टफोन कलरओएस 15.0 वर चालतो. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ (720×1,570 पिक्सेल) डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि टच सँपलिंग रेट 240Hz पर्यंत आहे. कंपनीने दावा केला आहे की, या डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 1,125 निट्सपर्यंत आहे. फोनमध्ये Oppo A सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेटसह 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे.
नव्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Oppo A6k 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम लेंस समाविष्ट आहे. रियर कॅमेरा यूनिट 10x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
Oppo A6k मध्ये 5G, वाई-फाई 5, ब्लूटूथ 5.4, बेईडू, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि हे डिव्हाईस फेशियल रिकग्निशनला देखील सपोर्ट करते. यामध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास, एक्सेलेरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर सारखे सेंसर दिले आहेत. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी या स्मार्टफोमध्ये IP69 + IP68 + IP66 रेटिंग दिली आहे. Oppo A6k मध्ये 7,000mAh बॅटरीसह 45W सुपरवूओक वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.