Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टाईल आणि साउंडचा परफेक्ट कॉम्बो! Oppo च्या नव्या इअरबड्सने यूजर्सना केलं थक्क, ओपन-ईयर डिझाईन अन् पावरफुल बॅटरीने सुसज्ज

Oppo Enco Clip 2 Launched: अलीकडेच ओप्पोने दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले होते. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने एक लेटेस्ट आणि दमदार इअबरड्स देखील लाँच केले आहेत. याची साउंड क्वालिटी तुमचं मन जिंकेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2026 | 12:47 PM
स्टाईल आणि साउंडचा परफेक्ट कॉम्बो! Oppo च्या नव्या इअरबड्सने यूजर्सना केलं थक्क, ओपन-ईयर डिझाईन अन् पावरफुल बॅटरीने सुसज्ज

स्टाईल आणि साउंडचा परफेक्ट कॉम्बो! Oppo च्या नव्या इअरबड्सने यूजर्सना केलं थक्क, ओपन-ईयर डिझाईन अन् पावरफुल बॅटरीने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो एन्को क्लिप 2 मध्ये ओपन-ईयर क्लिप डिझाईन आणि ड्युअल ड्रायव्हर्समुळे आरामदायी आणि संतुलित साउंड अनुभव मिळतो.
  • ब्लूटूथ 6.1, ड्युअल-डिव्हाइस पेयरिंग आणि AI कॉल नॉइज रिडक्शनमुळे कनेक्टिव्हिटी व कॉल क्वालिटी अधिक चांगली होते.
  • एकदा चार्ज केल्यावर 9.5 तास आणि केससह 40 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो, ज्यामुळे लाँग यूज शक्य होते.
टेक कंपनी Oppo ने अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या एका ईव्हेटंमध्ये Oppo Enco Clip 2 इअबरड्स लाँच केले आहेत. चीन आणि जगातील काही निवडक मार्केटमध्ये कंपनीने Oppo Find X9 Ultra आणि Find X9s Pro सह नवे इअरबड्स देखील लाँच केले आहेत. नव्या इअरबड्सची डिझाईन अतिशय आकर्षक असून हे डिव्हाईस रोजच्या वापरासाठी डिझाईन करण्यात आले आहे. या नव्या इअरबड्समध्ये ओपन-ईयर क्लिप डिझाईन, डुअल डायनामिक ड्राइवर्स आणि ब्लूटूथ 6.1 कनेक्टिविटी सारखे काही फीचर्स समाविष्ट आहेत. कंपनीने लाँच केलेल्या नव्या ओप्पो एन्को क्लिप 2 इअरबड्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सविस्तर जाणून घेऊया.

आता प्रत्येक बीट होणार अधिक क्लिअर आणि पॉवरफुल! दमदार फीचर्ससह नवे Honor इअरबड्स लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत

ओप्पो एन्को क्लिप 2 ची किंमत आणि उपलब्धता

ओप्पोने लाँच केलेल्या नव्या इअरबड्सच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, लेटेस्ट लाँच इअरबड्सची किंमत CNY 899 म्हणजेच सुमारे 12,300 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ओपन-ईयर हेडसेट हाय-ग्लॉस गोल्ड आणि स्पेस ग्रे या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईसची विक्री 24 एप्रिलपासून सुरु झाली आहे.  (फोटो सौजन्य – Oppo) 

ओप्पो एन्को क्लिप 2 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओप्पोने लाँच केलेल्या नव्या इअरबड्समध्ये ओपन-ईयर, ईयर-क्लिप डिझाईन देण्यात आले आहे. हे इअरबड्स अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत की, डिव्हाईस कानाच्या आतील भागाऐवजी बाहेरील भागावर फिट होते. यचा अर्थ असा आहे की, तुम्ही दिर्घकाळ या इअरबड्सचा वापर करू शकणार आहात. या इअरबड्समध्ये डुअल डायनामिक ड्राइवर सेटअप देखील देण्यात आला आहे. यामध्ये 11mm आणि 9mm चे ड्राइवर मिळणार आहेत.

संतुलित आवाज अनुभवता येणार

कंपनीने हे इअरबड्स अशा पद्धतीने डिझाईन केले आहेत की, यूजर्सना संतुलित आवाज अनुभवता येणार आहे. हे बड्स 20Hz ते 40kHz च्या फ्रीक्वेंसी रेंजला सपोर्ट करतात आणि यामध्ये जास्त इमर्सिव्ह ऐकण्याच्या अनुभवासाठी हेडफोन-साइड डेडिकेटेड ऑडिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कॉलदरम्यान आवाजाची स्पष्टता सुधारली जावी यासाठी यामध्ये AI-बेक्ड कॉल नॉइज रिडक्शनसाठी तीन-माइक्रोफोन सिस्टिम देखील दिले आहेत.

कनेक्टिविटी पर्याय

ओप्पो एन्को क्लिप 2 मध्ये ब्लूटूथ 6.1 आणि डुअल-डिवाइस पेयरिंग सपोर्ट सारखे कनेक्टिविटी पर्याय देण्यात आले आहेत. याच्या मदतीने तुम्ही दोन कनेक्टेड डिव्हाईसमध्ये अगदी सहजपणे स्विच करू शकणार आहात. इअरबड्सची वर्किंग रेंज 10 मीटरपर्यंत असल्याचे सांगितले जाते. उत्तम दर्जाच्या वायरलेस ऑडिओ ट्रान्समिशनसाठी, हे बड्स एसबीसी, एएसी आणि एलएचडीसी सारख्या अनेक ऑडिओ कोडेक्सना देखील सपोर्ट करतात.

16 दिवसांची बॅटरी आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ फीचर्स… नव्या OPPO स्मार्टवॉचने वेधले सर्वांचे लक्ष, इतकी आहे किंमत

बॅटरी लाईफ

बड्सच्या चार्जिंग केसमध्ये 530mAh बॅटरी दिली आहे. बड्स यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करतात. बड्सला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 80 मिनिटे लागतात. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर हे इअरबड्स 9.5 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम देऊ शकतात. चार्जिंग केससह, एकूण म्युझिक प्लेबॅक टाईम 40 तासांपर्यंत पोहोचू शकतो.

Web Title: Oppo enco clip 2 earbuds launched in open ear design it is the perfect combo of style and sound tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • earbuds
  • OPPO smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच… फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या
1

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच… फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या

नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 8,560mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… रंग पर्याय पाहून व्हाल थक्क
2

नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 8,560mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… रंग पर्याय पाहून व्हाल थक्क

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी
3

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट
4

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.