
आता फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! भारतात Oppo F35 सीरीजची धमाकेदार एंट्री, पावरफुल बॅटरी आणि दमदार कॅमेरा फीचर्सने सुसज्ज
ओप्पो एफ 35 प्रो च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 54,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन सनराइज ऑरेंज, वेव ब्लू, ट्विलाइट ब्राउन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. ओप्पो एफ 35 च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 42,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन वेव ब्लू, टाइटेनियम ग्रे, मिस्ट पिंक रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: OPPO)
ओप्पो एफ 35 प्रो 5G स्मार्टफोनमध्ये 1.5K अमोलेड अल्ट्रा ब्राईट डिस्प्ले देण्यात आला आहे. याची मॅक्सिमम ब्राईटनेस 3600 निट्सपर्यंत आहे.
प्रो मॉडेलमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 मॅक्स प्रोसेसर मिळणार आहे, जो 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. हा मागील जनरेशनच्या डायमेन्सिटी चिपच्या तुलनेत मल्टीकोर सीपीयू परफॉर्मंसमध्ये 30 टक्के आणि जीपीयू परफॉर्मंसमध्ये 35 टक्के बूस्ट ऑफर करतो. तर, ओप्पो एफ 35 5G मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 मॅक्स सह लाँच करण्यात आला आहे, जो स्मूद परफॉर्मंस ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये कूलिंगसाठी 5000mm² सुपरकूल व्हीसी सिस्टिम दिली आहे.
ओप्पो एफ 35 सिरीजमध्ये 50MP अल्ट्रा-वाइड नेचुरल सेल्फी कॅमेरा दिला आहे, जो 100° FOV ऑफर करतो. या कॅमेरा सेंसरचा आकार 1/2.88-इंच आणि अपर्चर f/2.1 आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. याचे 0.6x अल्ट्रा-वाइड लेंस वाइड व्यू ऑफर करतो. याच्या मदतीने यूजर्स ग्रुप सेल्फी क्लिक करू शकतात. यामध्ये एआय ऑटो वाईड अँगल स्विच सपोर्ट देण्यात आला आहे.
प्रो मॉडेलच्या रिअर कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये नैसर्गिक टोन आणि 50MP प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो 1/2-इंच सेंसर, अपर्चर f/1.8, ऑटोफोकस आणि ओआयएसला सपोर्ट करतो. ओप्पो एफ 35 मध्ये ट्रू-टोन ऑप्टिमाइजेशन 50MP प्रायमरी कॅमेरा दिला आहे. याचे सेंसर साइज 1/2-इंच, अपर्चर f/1.9 आणि ऑटोफोकसला सपोर्ट करते. प्रो मॉडेलमध्ये नवीन पोट्रेट मोड दिला आहे. सेकेंडरी कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड रियर कॅमेरा दिला आहे. यासोबतच स्टँडर्ड मॉडेलमध्ये 2 मेगापिक्सेलचा पोर्टेट कॅमेरा दिला आहे.
ओप्पो एफ 35 सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6-ईयर ड्यूरेबल 8000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W सुपरव्हूक फ्लॅश चार्जला सपोर्ट करते. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये IP69K, IP69, IP68 आणि IP66 रेटिंग सपोर्ट दिला आहे.