
Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर
Oppo लवकरच भारतात त्यांची नवीन फ्लॅगशिप Find X9 सीरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. या नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी सर्वजण उत्सुक आहेत. सर्वत्र Oppo च्या आगामी स्मार्टफोनची चर्चा सुरु आहे. हा नवीन स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच आता Oppo Find X8 Pro ची किंमत कमी झाली आहे. Oppo Find X8 Pro हा स्मार्टफोन क्रोमवर धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Oppo Find X8 Pro हा Oppo चा हा स्मार्टफोन क्रोमबुकवर मोठ्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे बजेट कमी असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम डिल ठरणार आहे. जर तुम्ही शक्तिशाली कॅमेरा असलेला प्रीमियम स्मार्टफोन शोधत असाल, तर ही सर्वोत्तम डील आहे. Oppo Find X8 Pro स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा, मोठी बॅटरी आणि स्टायलिश डिझाइन देण्यात आले आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डील तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग क्रोमवर उपलब्ध असलेल्या या डिलबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Oppo Find X8 Pro हा स्मार्टफोन कंपनीने भारतात 99,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनवर तब्बल 13 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. या डिस्काऊंटनंतर ग्राहक हा स्मार्टफोन 86,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. ही ऑफर Croma च्या वेबसाइट वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही एक लिमिटेड टाईम ऑफर असू शकते. त्यामुळे तुम्हाला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे.
Oppo Find X8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, जो Dolby Vision सपोर्ट आणि याची पीक ब्राइटनेस 4,500 निट्स आहे. Oppo चा हा प्रिमियम फोन MediaTek Dimensity 9400 चिपसेटसह बाजारात लाँच करण्यात आला होता. यामध्ये 5,910mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर ओप्पोच्या Find X8 Pro स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony LYT808 लेंस आहे, ज्याच्यासोबत 50MP Sony LYT600 पेरिस्कोप टेलीटॉम (3X ऑप्टिकल झूम), 50MP Sony IMX858 सेंसर (6X ऑप्टिकल झूम आणि 120X तक डिजिटल झूम) आणि 50MP Samsung अल्ट्रावाइड लेंस देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 32मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.