Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! 200MP कॅमेऱ्यासह भारतात आला नवा Oppo स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमतीवर टाका नजर

Oppo Find X9 Ultra Launched: फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार होण्यासाठी आणि डीएसएलआरला टक्कर देण्यासाठी ओप्पोने एक नवीन प्रिमियम स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा देण्यात आला आहे. प्री बुकींग करणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देखील सुरु करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 11:54 AM
फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! 200MP कॅमेऱ्यासह भारतात आला नवा Oppo स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमतीवर टाका नजर

फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! 200MP कॅमेऱ्यासह भारतात आला नवा Oppo स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमतीवर टाका नजर

Follow Us
Follow Us:
  • Oppo Find X9 Ultra स्मार्टफोन 1,69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत प्रीमियम फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 200MP Hasselblad-ट्यून्ड कॅमेरा आणि 120x डिजिटल झूमसारखे दमदार फोटोग्राफी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना प्रीमियम गिफ्ट बॉक्स, एक्सचेंज बोनस आणि 24 महिन्यांपर्यंत झिरो डाउन पेमेंटची सुविधा मिळणार आहे.
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने भारतातील स्मार्टफोन यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा यासाठी दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ज्यामध्ये Oppo Find X9 Ultra आणि Find X9s यांचा समावेश आहे. नवीन Oppo Find X9 Ultra फ्लॅगशिप डिव्हाईस Find X9 लाइनअपमधील टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल आहे. हे दोन्ही डिव्हाईस आधीपासूनच उपलब्ध असलेल्या Oppo Find X9 आणि Find X9 Pro मॉडेल्स लाईनअपमध्ये समाविष्ट असणार आहे. कंपनीने Oppo Find X9 Ultra स्मार्टफोन प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. या डिव्हाईसची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. याशिवाय याचे फीचर्स देखील दमदार आहेत.

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्रा ची किंमत आणि उपलब्धता

फाइंड एक्स 9 अल्ट्रा 12GB रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून याची सुरुवातीची किंमत 1,69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन कॅन्यन ऑरेंज आणि टुंड्रा अंबर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. नवीन स्मार्टफोन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ओप्पो ऑनलाईन स्टोअरवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Oppo) 

स्मार्टफोनचे प्री बुकींग करणाऱ्या यूजर्सना 11,000 रुपयांपर्यंत एक प्रीमियम गिफ्ट बॉक्स फ्री मिळणार आहे. या गिफ्ट बॉक्समध्ये ओप्पो एन्को एअर 5 प्रो टीडब्ल्यूएस आणि ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्रा साठी अधिकृत कव्हर केस उपलब्ध होईल. ही ऑफर 27 मेपर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच स्मार्टफोनवर 22,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील ऑफर केला जात आहे. एवढंच नाही तर ग्राहकांना 24 महिन्यांपर्यंत झिरो डाऊन पेमेंट फाइनेंसिंग सुविधा देखील मिळणार आहे. कंपनी एसबीआय कार्ड, एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक कार्ड आणि यूपीआय व्यवहारांद्वारे केलेल्या खरेदीवर 10% पर्यंत इन्स्टंट कॅशबॅक देत आहे.

ओप्पो फाइंड एक्स 9 अल्ट्रा चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

लेटेस्ट लाँच प्रिमियम स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच क्यूएचडी+ अमोलेड स्क्रीन दिली आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनची पीक ब्राइटनेस 1,800 निट्सपर्यंत आहे. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन मिळणार आहे.

प्रोसेसर

डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर बेस्ड कलरओएस 16 वर चालतो. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलाईट जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच हे डिव्हाईस अ‍ॅड्रेनो 840 जीपीयू, 16 जीबी पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅमने सुसज्ज आहे.

Free Fire Max: गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका हे रिवॉर्ड्स

कॅमेरा

स्मार्टफोनमुळे फोटोग्राफीचा अनुभव नेक्स्ट लेव्हल होणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Hasselblad-ट्यून्ड क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे, जिथे OIS सह 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा का अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 200-मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-टेलीफोटो कॅमेरा आहे. कॅमेरा 10x पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फोनमध्ये समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हे डिव्हाइस 30fps वर 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग, तसेच 120fps पर्यंत 4K रेकॉर्डिंग आणि डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Oppo Find X9 Ultra ची किंमत किती आहे?

    Ans: Oppo Find X9 Ultra ची सुरुवातीची किंमत 1,69,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

  • Que: Oppo Find X9 Ultra कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध आहे?

    Ans: हा स्मार्टफोन कॅन्यन ऑरेंज आणि टुंड्रा अंबर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

  • Que: Oppo Find X9 Ultra मध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

    Ans: फोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट देण्यात आला आहे.

Web Title: Oppo find x9 ultra launched in india with 200mp camera read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
1

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
2

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स
3

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
4

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.