Free Fire Max: गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका हे रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्समधील मोको स्टोअर पुढील 2 आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे. म्हणजेच प्लेअर्सना पुढील 2 आठवड्यांपर्यंत विविध गेमिंग वस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. मोको स्टोअरमध्ये दोन सेक्शन आहेत, ज्यामध्ये ग्रँड प्राईज आणि बोनस प्राईज यांचा समावेश आहे. दोन्ही सेक्शनमधून, तुम्हाला अशा दोन वस्तू निवडाव्या लागतील ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचे नशीब आजमावू इच्छिता. एकदा तुम्ही दोन वस्तू निवडल्यावर आणि नेक्स्ट पेजवर गेल्यावर, तुम्हाला सहा वस्तूंची यादी दिसेल. तुम्ही या यादीतील वस्तू मिळवण्यासाठी स्पिन कराल. (फोटो सौजन्य – YouTube)
मोटो स्टोअरमध्ये एकूण सहावेळा स्पिन करू शकता. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. तिसऱ्या स्पिनची किंमत 59 डायमंड्स आहेत. तर 99 डायमंड्स खर्च करून चौथ्यांदा स्पिन करू शकता. तर पाचव्यांदा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि सहाव्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 599 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.






