गेमर्सची प्रतिक्षा संपली! Oppo च्या नव्या गेमिंग स्मार्टफोनने केली धडाकेबाज एंट्री, लॅपटॉपसारखा कूलिंग फॅन आणि तगडी बॅटरी...
Oppo ने अखेर त्यांची बहुप्रतिक्षित K13 Turbo सिरीज भारतात लाँच केली आहे. कंपनीने या सिरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स मिडरेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जे गेमर्स दमदार गेमिंग स्मार्टफोनच्या शोधात असतील त्यांच्यासाठी Oppo K13 Turbo सिरीज एक उत्तम पर्याय आहे. Oppo K13 Turbo Pro आणि K13 Turbo हे दोन स्मार्टफोन नवीन सिरीजअंतर्गत लाँच करण्यात आले आहेत.
स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन IPX6, IPX8, आणि IPX9 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.
Oppo K13 Turbo स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. 8 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 30000 रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये टॉप व्हेरिअंट 27999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. या फोनची विक्री 18 ऑगस्टपासून सुरू होईल. (फोटो सौजन्य – X)
Oppo K13 Turbo Pro स्मार्टफोन देखील दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. प्रो व्हेरिअंटची विक्री 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
OPPO K13 Turbo – MediaTek Dimensity 8450 chip.#OPPOK13TurboSeries #LiveUnstoppable #OPphone pic.twitter.com/78nhkiFBdh
— Mukul Sharma (@stufflistings) August 11, 2025
Oppo K13 Turbo Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.8-इंच LTPS AMOLED पॅनल देण्यात आला आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन क्वालकॉम Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज देण्यात आलं आहे. या फोनमध्ये 7000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
ओप्पोचा हा फोन Android 15 वर आधारित Color OS 15 वर चालतो. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याच्यासोबत 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. यासोबतच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Oppo K13 Turbo स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले, बॅटरी आणि कॅमरा प्रो व्हेरिअंटप्रमाणेच आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8450 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो. यासोबतच, फोनमध्ये बिल्ट-इन फॅन येतो, जो उष्णता व्यवस्थापनासाठी प्रदान केला जातो. कंपनीचा दावा आहे की हा कूलिंग फोन फोनचे तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने कमी करतो.
Oppo K13 Turbo ची लाँच डेट काय आहे?
11 ऑगस्ट
Oppo K13 Turbo चे बॅटरी स्पेक्स काय आहे?
7000 mAh बॅटरी
प्रो व्हेरिअंटची विक्री कधीपासून सुरु होणार आहे?
15 ऑगस्ट