Jio Recharge Plan: फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह मिळवा अनलिमिटेड इंटरनेट.... रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 'हे' बेनिफिट्स
डेटा आणि कॉलिंगसह एंटरटेनमेंटसाठी जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन ऑफर करणाऱ्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 355 रुपये आहे. हा यूजर्ससाठी एक फायदेशीर प्लॅन आहे. हा नवीन प्लॅन नाही. म्हणजेच कंपनीने यापूर्वीच हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना बरेच फायदे ऑफर केले जातात. त्यामुळे हा प्लॅन यूजर्ससाठी व्हॅल्यू फॉर मनी ठरतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंटरनेट आणि एंटरटेनमेंटचा कॉम्बो असलेल्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 25GB हाई-स्पीड डेटा ऑफर केला जातो. याचा अर्थ असा की या प्लॅनमध्ये 1.5GB डेटा मर्यादा नाही आणि तुम्हाला डेटा संपण्याची काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही रोज अनलिमिटेड इंटरनेटचा देखील वापर करू शकता. पण जर तुम्ही एकाच वेळी संपूर्ण डेटा संपवला तर इंटरनेट स्पीड 64 Kbps होणार आहे. याशिवाय, कंपनीच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात, ज्यामुळे हा एक बॅलेंस्ड मंथली प्लॅन बनतो.
या रिचार्ज प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजेच यामध्ये यूजर्सना 3 महिन्यांसाठी जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स त्यांच्या मोबाईल किंवा टीव्हीवर T20 विश्वचषकाचे थेट सामने सहजपणे पाहू शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओटीव्ही आणि जिओएआयक्लाउडचा एक्सेस देखील फ्री मिळणार आहे, ज्यामध्ये 50GB पर्यंत क्लाउड स्टोरेजची सुविधा दिली जाणार आहे.
एवढंच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये गुगल जेमिनी प्रोचे 18 महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाणार आहे. लक्षात ठेवा की जिओहॉटस्टारचे फायदे सुरू ठेवण्यासाठी, तुम्हाला प्लॅन एक्सपायर झाल्यानंतर 48 तासांच्या आत पुन्हा रिचार्ज करावे लागेल आणि तुम्ही ज्या जिओ नंबरने रिचार्ज केले आहे त्याच नंबरने लॉगिन करावे लागेल, तरच तुम्हाला हा फायदा मिळेल.






