Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

16 दिवसांची बॅटरी आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ फीचर्स… नव्या OPPO स्मार्टवॉचने वेधले सर्वांचे लक्ष, इतकी आहे किंमत

ओप्पोने प्रीमियम सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टवॉच लाँच करून आपल्या इकोसिस्टमचा विस्तार केला आहे. टायटॅनियम डिझाइन, दमदार बॅटरी लाईफ आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ ट्रॅकिंग फीचर्समुळे हे स्मार्टवॉच यूजर्ससाठी खास ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2026 | 01:29 PM
16 दिवसांची बॅटरी आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ फीचर्स... नव्या OPPO स्मार्टवॉचने वेधले सर्वांचे लक्ष, इतकी आहे किंमत

16 दिवसांची बॅटरी आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ फीचर्स... नव्या OPPO स्मार्टवॉचने वेधले सर्वांचे लक्ष, इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो वॉच एक्स 3 मध्ये 1.5-इंच एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन W5 चिपसेट दिला आहे.
  • 100+ स्पोर्ट्स मोड्स, ईसीजी, SpO2 आणि स्लीप ट्रॅकिंगसारखे प्रगत हेल्थ फीचर्स उपलब्ध आहेत.
  • 646mAh बॅटरीसह हे स्मार्टवॉच 5 दिवसांपर्यंत आणि पॉवर सेव्हर मोडमध्ये 16 दिवसांपर्यंत चालते.
नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका टेक ईव्हेंटमध्ये ओप्पोने Find X9 Ultra आणि Find X9s Pro या स्मार्टफोन्ससह एक स्मार्टवॉच देखील लाँच केली आहे. कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टवॉच Oppo Watch X3 या नावाने सादर केले आहे. कंपनीने त्यांच्या प्रिमियम डिव्हाईससह स्मार्टवॉच इकोसिस्टमचा विस्तार केला आहे. स्मार्टवॉच मार्च महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. ओप्पोने लाँच केलेले स्मार्टवॉच जबरदस्त टाइटॅनियम डिझाईन, दिर्घकाळ बॅटरी लाईफ आणि अधिक दमदार हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सने सुसज्ज आहे. हे डिव्हाईस प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. ओप्पो वॉच एक्स 3 ची किंमत आणि इतर डिटेल्स सविस्तर जाणून घेऊया.

देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी

ओप्पो वॉच एक्स 3 ची किंमत आणि उपलब्धता

ओप्पोने लाँच केलेल्या नवीन स्मार्टवॉचची किंमत फ्रांसमध्ये EUR 379 म्हणजेच सुमारे 41,700 रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच टाइटेनियम आणि ऑब्सीडियन ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची विक्री वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या दिवशी सुरु होणार आहे. येत्या काही आठवड्यांत ओप्पो प्रत्येक बाजारपेठेसाठी उपलब्धतेचा तपशील जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य – OPPO)

ओप्पो वॉच एक्स 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ओप्पो वॉच एक्स 3 मध्ये 1.5-इंच एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 466 x 466 पिक्सेल, डेंसिटी 310 पीपीआय आहे. थेट सूर्यप्रकाशात स्पोर्ट्स मोडमध्ये हे 3,000 निट्स पर्यंतची कमाल ब्राइटनेस आणि सफायर क्रिस्टल प्रोटेक्शन देते. हे स्मार्टवॉच स्नॅपड्रॅगन W5 चिपवर आधारित आहे, ज्यासोबत बीईएस2800बीपी एमसीयू आहे. या स्मार्टवॉचमध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आले आहे. हे कलरओएस वॉच 8.0 वर चालते आणि व्हॉइस असिस्टन्ससाठी मॅप्स, वॉलेट, यूट्यूब म्युझिक आणि जेमिनी सारख्या गूगल ॲप्सना सपोर्ट करते.

हेल्थ आणि फिटनेससाठी या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि ऑटोमॅटिक एक्टिविटी रिकॉग्निशनची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 मेजरमेंट, रिस्ट टेम्परेचर सेंसिंग, डिटेल एनालिसिससह स्लीप ट्रॅकिंग आणि ECG फंक्शन सारखे एडवांस ट्रॅकिंग फीचर्स समाविष्ट आहेत. 60-सेकंदांचा आरोग्य आढावा हृदयाचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यांसारख्या मुख्य आरोग्य मापदंडांचा संक्षिप्त सारांश देतो.

Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! गेमर्सना मिळणार ‘या’ विशेष सुविधा, किंमत ठरली खास

ओप्पो वॉच एक्स 3 मध्ये डुअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि एनएफसी सपोर्ट सारखे कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच अशा अँड्रॉईड डिव्हाईससोबत काम करते, ज्यामध्ये गूगल मोबाईल सर्विससह अँड्रॉईड 9.0 किंवा त्यावरील वर्जनवर चालते. यामध्ये सटीक लोकेशन ट्रॅकिंगसाठी डुअल-बँड GNSS सपोर्ट देण्यात आला आहे. पाण्यापासून सुरक्षेसाठी यामध्ये 5ATM रेटिंग दिली आहे. हे IP68 आणि IP69 प्रमाणपत्रांसह, तसेच MIL-STD-810H टिकाऊपणासह येते. ओप्पो वॉच एक्स 3 मध्ये 646mAh बॅटरी दिली आहे. याबाबत असा दावा करण्यात आला आहे की, डिव्हाईस स्मार्ट मोडमध्ये 5 दिवसांपर्यंत आणि पावर सेव्हर मोडमध्ये 16 दिवसांपर्यंत चालते. कंपनीचे म्हणणे आहे की, हे घड्याळ फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगवर दिवसभर चालू शकते.

Web Title: Oppo watch x3 smartwatch launched in premium segment read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर
1

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित
2

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?
3

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?

ChatGPT वापरताय? तुम्हालाही लागू शकतो लाखोंचा चुना… सर्च रिझल्टमध्ये दिसल्या बनावट शॉपिंग लिंक्स; असं राहा सुरक्षित
4

ChatGPT वापरताय? तुम्हालाही लागू शकतो लाखोंचा चुना… सर्च रिझल्टमध्ये दिसल्या बनावट शॉपिंग लिंक्स; असं राहा सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.