HMD (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
HMD ने घोषणा केली आहे की ते फ्री स्ट्रीम टेकनॉलॉजि डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) ने सुसज्ज असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. D2M टेकनॉलॉजिच्या मदतीने, वापरकर्ते वाय-फाय किंवा इंटरनेट सेवेशिवाय ओटीटी, लाईव्ह टीव्ही, व्हिडिओ, ऑडिओ आणि टेक्स्ट मेसेजेस अॅक्सेस करू शकतात.
WhatsApp वर येत आहे नवीन अपडेट! मेसेजमध्ये देऊ शकता आता “असे ” रिअक्शन
या फोनची अधिकृत घोषणा वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 मध्ये केली जाईल. हा कार्यक्रम 1 मे ते 4 मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित केला जाणार आहे.
HMD लवकरच D2M टेकनॉलॉजि सुसज्ज फोन लाँच करणार आहे.
एचएमडीचे म्हणणे आहे की D2M-टेकनॉलॉजिवर चालणारा हा फोन भारतात बनवला आणि डिझाइन केला जाईल. कंपनीने म्हटले आहे की या आगामी स्मार्टफोनची डिझाइन कमी किमतीची असेल, म्हणजेच त्याची किंमत कमी असेल. हा फोन तेजस नेटवर्कद्वारे पावर्ड डायरेक्ट टू मोबाइल टेकनॉलॉजिच्या सपोर्टने लाँच केला जाईल.
तेजस नेटवर्क गेल्या काही काळापासून प्रसार भारती आणि आयआयटी कानपूर यांच्या सहकार्याने D2M तंत्रज्ञानाची टेस्टिंग घेत आहे. तेजस नेटवर्क्स ही कंपनी बीएसएनएलच्या 4G आणि 5G नेटवर्क्सना अपग्रेड करत आहे.
मागील काही वर्षापासून दिल्ली, नोएडा आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये D2M नेटवर्कची टेस्टिंग सुरू आहेत. यासंदर्भातील टेस्टिंगचा दुसरा टप्पा लवकरच देशभरात सुरू होणार आहे. अद्याप, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आहे.
डायरेक्ट-टू-मोबाइल D2M टेकनॉलॉजि म्हणजे काय?
डायरेक्ट-टू-मोबाइल किंवा D2M टेकनॉलॉजि ब्रॉडकास्ट आणि ब्रॉडबँड दोन्ही एकत्रित करते. त्याच्या मदतीने, वापरकर्ते वाय-फाय आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय ओटीटी, लाईव्ह टीव्ही, व्हिडिओ-ऑडिओ आणि टेक्स्ट मेसेज अॅक्सेस करू शकतील. हे तंत्रज्ञान FM RADIO सारखे काम करेल, जे एका निश्चित फ्रिक्वेन्सीवर माहिती प्रसारित करते. या तंत्रज्ञानामुळे सेल्युलर नेटवर्कवरील भार कमी होईल. यासाठी, फोनमध्ये एक विशेष रिसीव्हर बसवला जाईल, जो ब्रॉडकास्ट कंटेंट सिग्नल प्राप्त करेल.
Vivo ने लाँच केला सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन, 6GB RAM सोबत मिळणार 5500mAhची बॅटरी