VIVO (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
Vivo Y37c स्मार्टफोन कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम,128 स्टोरेज आणि Unisoc T7225 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. या फोनला IP64 रेटिंग आहे ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून प्रतिरोधक बनतो. हा Vivo फोन 13 MP चा रियर कॅमेरा आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरासह लाँच करण्यात आला आहे.
२०२५ मध्ये किती RAMचा स्मार्टफोन घेणं बरोबर? खरेदी करण्यापूर्वी माहित करून घ्या
Vivo ने काही दिवसांपूर्वी परवडणाऱ्या किमतीत दोन नवीन स्मार्टफोन विवो Y37 आणि विवो Y37m लाँच केले. यानंतर, कंपनीने Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असलेला Vivo Y37 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. आता कंपनीने त्यांच्या होम मार्केट चीनमध्ये Vivo Y37c लाँच केला आहे.
Vivo Y37c ची फिचर
Vivo Y37c स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.56-इंचाची LCD स्क्रीन आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन HD प्लस आहे, रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि ब्राइटनेस 570 निट्स आहे. यासोबतच, या फोनमध्ये डिस्प्ले आय प्रोटेक्शन फीचर्स देण्यात आले आहेत. जसे की – निळा प्रकाश कमी करते आणि पाहण्याचा आराम सुधारते. Vivo Y37c स्मार्टफोनला IP64 रेटिंग आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून संरक्षित आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, Vivo Y37c स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. यासोबतच, जर आपण रियर कॅमेरा सेन्सरबद्दल बोललो तर, या फोनमध्ये LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या विवो फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित OriginOS 4 वर चालतो.
Vivo Y37c स्मार्टफोन Unisoc T7225 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6GB LPDDR4x RAM आणि 128GB स्टोरेज आहे. मल्टीटास्किंग आणि चांगल्या कामगिरीसाठी यात व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या Vivo फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ड्युअल SIM 4G, Wi-Fi 5, Bluetooth 5.2, USB-C, आणि 3.5mm ऑडिओ जॅक आहे.
Vivo Y37c ची किंमत आणि उपलब्धता
Vivo Y37c स्मार्टफोन चीनमध्ये 1199 युआन (सुमारे १४ हजार रुपये) च्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन सध्या चीनमध्ये डार्क ग्रीन आणि टायटॅनियम रंगाच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. भारत आणि इतर बाजारपेठांमध्ये या फोनच्या लाँचिंगबाबत विवोने अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
WhatsApp वर येत आहे नवीन अपडेट! मेसेजमध्ये देऊ शकता आता “असे ” रिअक्शन