OTT सबस्क्रिप्शनचा नवा नियम होणार लागू? प्लॅन कॅन्सल करणं होणार आणखी कठीण? नेमकं प्रकरण आहे तरी काय?
स्मार्टफोनपासून स्मार्ट टीव्ही युजर्सपर्यंत सर्वजण ओटीटी प्लॅटफॉर्मना चांगला प्रतिसाद देतात. तुमच्या आवडत्या टीव्ही शोपासून सिनेमापर्यंत सर्व काही तुम्ही या ओटीटी ॲप्सवर पाहू शकता. काही प्लॅटफॉर्म तुम्हाला मोफत सर्विस देखील ऑफर करतात. त्यामुळे केबल किंवा डिश टीव्हीसाठी पैसे देण्याऐवजी लोकं ओटीटी प्लॅटफॉर्मना प्रधान्य देतात.
नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओसारखे स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म आधीपासून लोकांना पसंत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ओटीटी प्लॅटफॉर्मचा कंटाळा आला तर तुम्ही सबस्रिप्शन कॅन्सल देखील करू शकता. याशिवाय अशी देखील सर्विस उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही केवळ एका महिन्यासाठी सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करु शकता, आणि नंतर बंद करू शकता. ज्यामुळे तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढ्याच काळासाठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकता, आणि तुमचे आवडते शो आणि सिरीज एन्जॉय करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
या ओटीटी प्लॅटफॉर्मचा सबस्क्रिप्शन रद्द करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कॉल किंवा कस्टमर केयरची गरज भासणार नाही. केवळ एका क्लिकवर तुम्ही सबस्क्रिप्शन कॅन्सल करू शकत होतात. याच कारणामुळे अनेक लोकं ओटीटी प्लॅटफॉर्मना प्राधान्य देतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून अशा तक्रारी आल्या आहेत की, काही व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन कॅन्सल करणं कठीण झालं आहे. याचाच विचार करून अलीकडेच फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने ‘क्लिक टू कॅन्सल रूल’ प्रस्तावित केला होता. मात्र संयुक्त राज्य अमेरिकेच्या न्यायालयाने हा फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने केलेला हा प्रस्ताव फेटाळला आहे.
जर न्यायालयाने नवीन नियम स्विकारल असता तर नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिजनी प्लस आणि एचबीओ मॅक्स सारख्या स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मचे सब्सक्रिप्शन कॅन्सल करणं साइन अप करण्याइतकेच सोपे झाले असते. याशिवाय फ्री ट्रायलला पेड प्लॅनमध्ये बदलण्यापूर्वी युजर्सची परवानगी घेणं आवश्यक असेल आणि कंपन्यांना सांगावे लागणार की प्रमोशनल प्लॅन कधी संपणार आहे.
फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने अर्ज केलेल्या या नियमांना मंजूरी मिळाली असती तर युजर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता. तथापि, न्यायालयाने म्हटले आहे की FTC ने आर्थिक परिणाम विश्लेषण केलेले नाही, त्यामुळे हा नियम सध्या लागू करता येणार नाही. याचा अर्थ असा की सध्या स्ट्रीमिंग कंपन्यांवर कँसलेशन प्रोसेस सोपी करण्यासाठी कोणताही दबाव नाही आणि भविष्यात ही प्रोसेस अधिक कठीण करण्यापासून कोणीही त्यांना रोखू शकत नाही.
काही ओटीटी प्लॅटफॉर्म्स त्यांच्या युजर्सना सोप्या स्टेप्ससह सब्सक्रिप्शन प्लॅन कॅन्सल करण्याची सुविधा देतात. मात्र ही प्रोसेस बदलली जाऊ शकते. कंपन्या अतिरिक्त स्टेप्स जोडू शकतात. इतकेच नाही तर सबस्क्रिप्शन रद्द करण्यासाठी तुम्हाला कस्टमर सपोर्टला कॉल करावा लागू शकतो.