Vivo चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, AMOLED डिस्प्ले आणि वायरलेस फास्ट चार्जिंगने सुसज्ज! जाणून घ्या स्पेसिफिकेशनस
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने अलीकडेच नवीन फोल्ड आणि फ्लिप फोन लाँच केले आहेत. आता या स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी टेक कंपनी Vivo ने देखील त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. आज सोमवारी 14 जुलै रोजी Vivo X Fold 5 भारतात लाँच करण्यात आला आहे. इतर स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी कंपनीने हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. यासोबतच कंपनीने त्यांच्या प्रिमियम सिरीजमधील अफोर्डेबल स्मार्टफोन X200 FE देखील लाँच केला आहे.
सॅमसंगच्या फोल्ड फोनप्रमाणे, Vivo चा नवीन X Fold 5 स्मार्टफोन देखील खूप स्लिम आहे आणि या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा कव्हर स्क्रीन आणि 8.03 इंचाचा मोठा आतील AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत थोडी जास्त आहे. चला तर मग Vivo च्या नव्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर, Vivo च्या नव्या X Fold 5 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाची कवर स्क्रीन आणि 8.03 इंचाचा मोठा इनर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमधील दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्सच्या पीक ब्राइटनेसने सुसज्ज आहेत. फोल्ड केल्यानंतर, फोनची जाडी फक्त 9.2 मिमी राहते, ज्यामुळे असं स्पष्ट होतं की हा त्याच्या सेगमेंटमधील सर्वात पातळ आणि हलका फोल्डेबल फोन आहे. तर उघडल्यानंतर हा नवीन स्मार्टफोन फक्त 4.3 मिमी जाड राहतो.
Vivo X Fold 5 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यासोबत फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB ची इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आली आहे.
Vivo X Fold 5 फोनच्या बॅटरी क्षमतेबद्दल बोलायचं झाले तर, या डिव्हाइसमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 80W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 50MP चा Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 100x पर्यंत डिजिटल झूम ऑफर करतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 20MP चे दोन फ्रंट कॅमेरा देण्यात आले आहेत. Vivo च्या या डिव्हाईसमध्ये जेमिनी असिस्टेंट, AI इरेज आणि एक शॉर्टकट बटन सारखे नवीन AI फीचर्स देण्यात आले आहेत.
Vivo X Fold 5 ची किंमत 1,49,999 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 16GB रॅम आणि 512 GB स्टोरेज दिली जाते. तर सॅमसंगच्या नव्या फोल्ड 7 ची किंमत 1,74,999 रुपये आहे. त्यामुळे किंमतीबाबत बोलायचं झालं तर विवोचा नवीन फोल्डेबल फोन सॅमसंगच्या स्मार्टफोनपेक्षा स्वस्त आहे.